Breaking News

*आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकारातुन निर्जंतुकीकरण मशीन व मास्‍कचे वाटप* *लॉकडाऊन टाळायचे असेल तर मास्‍क वापरा – डॉ. गुलवाडे* *महानगर भाजपाचा उपक्रम*

*आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकारातुन निर्जंतुकीकरण मशीन व मास्‍कचे वाटप*

*लॉकडाऊन टाळायचे असेल तर मास्‍क वापरा –
डॉ. गुलवाडे*

*महानगर भाजपाचा उपक्रम*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र सरकारला ७ वर्षपुर्ण झाल्‍या प्रित्‍यर्थ महानगरात विविध सेवाप्रकल्‍प राबविले जात आहे. याचाच एक भाग म्‍हणुन आज सोमवार ७ जुनला ओमनगर येथे आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकारातुन निर्जंतुकीकरण मशीन व मास्‍कचे वाटप करण्‍यात आले. यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍य वृक्षारोपणही करण्‍यात आले.


याप्रसंगी बोलताना महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे म्‍हणाले, कोरोनाच्‍या आचार संहितेचे पालन होत नसल्‍याने कोरोनाच्‍या दुस-या लाटेचा सामना आम्‍हाला करावा लागला. परिसराच्‍या स्‍वच्‍छतेसह भौतिक अंतराचे भान आम्‍हाला असायला पाहीजे. या संकटात मास्‍कची भुमीका महत्‍वाची आहे. असे असताना मास्‍क न वापरल्‍यामुळे पुन्‍हा कोरोनाचे संकट ओढावले त्‍यामुळे लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. लॉकडाऊन टाळायचे असेल तर मास्‍क वापरा असे आवाहन डॉ. गुलवाडे यांनी केले.
यावेळी भाजपा माध्‍यम संपर्क प्रमुख प्रशांत विघ्‍नेश्‍वर, सचिव रामकुमार आकापेल्‍लीवार, श्रीराम बहुरीया, लक्ष्‍मण शर्मा, बिनु बहुरीया, रेखा विश्‍वकर्मा, कमला बावरे, राजु गावडे, मंगला गावडे, गिरीष पाल, पप्‍पी पाल, आरती भारती, शारदा कोडापे, धर्मा बावरे, ज्‍योती माणुसमारे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी डॉ. गुलवाडे यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात येवुन उपस्थित जनतेला मास्‍क वितरीत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार व्‍यक्‍त रामकुमार आकापेल्‍लीवार यांनी केले.हे विशेष

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …