Breaking News

*प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र वराडा येथे लसिकरण शिबीरात ६५ लोकांचे लसीकरण*

*प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र वराडा येथे लसिकरण शिबीरात ६५ लोकांचे लसीकरण*

 

पारशिवनी: – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वराडा येथे ग्राम पंचायत सरपंचा यांचे अथक प्रयत्नाने लसीकरण शिबीरात घेऊन ६५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.


कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे ४५ वर्ष व त्या वरील वयाच्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम प्रा. आ. उपकेन्द्र वराडा येथे राबवुन लसीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत मंगळवार (दि.८) जुन २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या वैद्यकीय अधिकारी वैशाली हिंगे यांचे मार्गदर्शनात व ग्रा. प.वराडा सरपंचा विद्याताई चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत उपकेंद्र वराडा येथे लसीकरण शिबीर घेऊन ६५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. शिबीराच्या यशस्वितेकरिता सीएचओ सायली शेळकी, ए एन एम प्रेरणा घोटेकर, उषा जंगम,एच ए अशोक सोनटक्के, एम पि ड्बल्यु गौरी डोणारकर सरपंचा विदया चिखले, उपसरपंच जषा हेटे, राजेश काकड़े, संजय टेले सध् वराडा ग्गम पंचायत चे सदस्य कर्मचारीआदीने परिश्रम घेतले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …