Breaking News

*आर्वी तहसील कार्यालय आग प्रकरणाची CBI चौकशी करा* *तहसीलदार आर्वी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य मंत्री अब्दुल सत्तार महसूल, यांना प्रति पाठवल्या*

*आर्वी तहसील कार्यालय आग प्रकरणाची CBI चौकशी करा*

*तहसीलदार आर्वी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य मंत्री अब्दुल सत्तार महसूल, यांना प्रति पाठवल्या*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
वर्धा – विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग वर्धा यांचा अभिप्राय संशयास्पद फॉरेन्सिक तपासणी ची तहसीलदार आर्वी कडे मागणी*
आर्वी.सारंगपुरी मौज्यातील अवैध उत्तखनन व विना रॉयल्टी चोरी चा मुरूम वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही ची मागणी दिनांक 8/5/2021 रोज मंगळवारी युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात आर्वी तील नागरिक व स्वाभिमानी सैनिकांनी तहसीलदार आर्वी विद्यासागर चौहान यांच्या मार्फत मुख्यमंत्री व संबंधित मंत्री गनांना निवेदन द्वारे दि 13/05/2021 रोजी लागलेली आग संशयास्पद असून जळालेले कागदपत्रे ही तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाची व गरजेची होती आता त्यांची मोठी फरफट होणार अशी चर्चा केली तसेच या सोबतच ही कागदपत्रे अनेक गैर प्रकार, भ्रष्टाचार, शासकीय प्रशासकीय खासगी जमिनीत झालेले गौड बंगाल, अवैध समोर आणणारे होते व सर्व खालील बाबी प्रामुख्याने निवेदनात नमूद केल्या होत्या
आर्वी येथील तहसील कार्यालयात लागलेली आग याची CBI द्वारा चौकशी करणेबाबत….

मा. महोदय सेवेशी सविनय पूर्वक नम्र निवेदन सादर आहे कि दि13/05/2021 ला मध्यरात्री तहसील कार्यालयातील कार्यालयात आग लागली. आणि या आगीत महत्वपूर्ण कागदपत्रे -दस्तऐवज जळून खाक झाल्याचा दावा हा बनावि व आभासी असल्याची चर्चा सर्वत्र आहे.


आर्वी तहसील कार्यालयाच्या ज्या कार्यालयात आग लागली तिथे कोणतंही आग लागण्या सारख उपकरण नव्हतं किंवा खूप दाब येईल असं इलेकट्रिक उपकरण तिथे नव्हतं तसेच आग लागल्यावर इतकी आग शॉर्ट सर्किट मुळे त्वरित वाढावी असं ज्वलंन शील साहित्य, किंवा स्थिती नसल्याने इतकी आग इतक्या झपाट्याने कशी वाढली हा चिंतनाचा भाग आहे तिथे असलेलं जुन लाकडी साहित्य छोट्या शॉर्ट सर्किट मुळे आग पकडू शकेल असं सामान्य चित्र दिसत नाही, शॉर्टसर्किट मुळे फ्युज उडने, स्ट्रीप पडणे असा प्रकार होणे अपेक्षित आहे याची ही तपासणी करन्यात यावी,तसेच विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग वर्धा यांच्या अहवालात नगर पालिकेची फायर ब्रिगेड च वाहन वेळीच न पोहचणे, आग विझवन्यासाठी केले जाणारे प्रयत्न केलेच गेले नाही हे कारण दिलेले आहे त्यात कुठे ही विद्युत शॉर्ट्सर्किट मुळे च ही आग लागली किंवा संबंधित प्रॉपर स्पॉट वर शॉर्टसर्किट झाले असं नमूद नाही, या अहवालात जर -तर -झाले असेल असा वरपंखी तपासणी अभिप्राय दिला आहे जो कि संशयास्पद आहे आणि यात स्पष्ट पणे मोठं कट कारस्थान असल्याचे लक्षात येते आणि हा तपासणी अभिप्राय कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावात बनवल्यागत कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न असा प्रथम दर्शनी दिसतोय, तरी याची उच्चंस्तरीय चौकशी व्हावी जेणेकरून खरा प्रकार लक्षात येईल परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणी करावेत, त्या रात्री या परिसरात असलेले मोबाईल लोकेशन चेक करावे, तहसील कार्यालयातील गौण खनिज शी संबंधित कागदपत्रे व दस्तऐवज, शासकीय, प्रशासकीय तथा खासगी जमिनी च्या कागदपत्र दस्तऐवज, काही शासकीय -प्रशासकीय -खाजगी जमिनी झालेले घोड उघड होऊ शकते, महसूल, गौण खनिजाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणाचे कागदी पुरावे नष्ट करण्याचे हेतूने तहसील कार्यालयात आग लावण्याची जास्त शक्यता आहे तरी या दिशेने तपास यंत्रणेने तपास व्हावा अशी आर्वीकर जनतेची व आमची विनंती आहे तसेच तपास यंत्रणेची काम स्थानिक कोणतीही एजन्सी ने केल्यास शासन- प्रशासनाच्या किंवा राजकीय दबावात हे प्रकरनाची वास्तविकता समोर येण्यास अडचण जाईल तरी सविनय पूर्वक विनंती आहे कि सदर प्रकरणाची उच्च स्तरीय CBI कडून च चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे या संबंधाने लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व संबंधित सर्व मंत्री गण वरिष्ठ अधिकारी व राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेतली जाईल असं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले निवेदन देताना दिलीप पोटफोडे, साहेबराव घोडाम, राजु राठोड, बबलू धानोरकर, प्रफुल राठोड, शेख चांद, सौरभ वानखेडे, जयंत गभणे, राजु बोरकुटे, शन्कर हत्तीमारे, नितीन वानखेडे, वासुदेव सपकाळ व आर्वी चे नागरिक उपस्थित आहे होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …