Breaking News

*18 व्यां वर्षापासून गरीब , निराधार , अपंग , विधवा , पती पासून वेगळ्या राहत असलेल्या वर्गांसाठी योजनांचा लाभ मिळवून द्या* *मंगला ठक ( लांबट) काँग्रेस महीला तालुका अध्यक्ष हिंगणघाट आणि अध्यक्ष (म. प्रदेश) ज्येष्ठ नागरिक निराधार संघटना तर्फे मा.नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कांग्रेश पार्टी यांना निवेदन*

*18 व्यां वर्षापासून गरीब , निराधार , अपंग , विधवा , पती पासून वेगळ्या राहत असलेल्या वर्गांसाठी योजनांचा लाभ मिळवून द्या*

*मंगला ठक ( लांबट) काँग्रेस महीला तालुका अध्यक्ष हिंगणघाट आणि अध्यक्ष (म. प्रदेश) ज्येष्ठ नागरिक निराधार संघटना तर्फे मा.नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कांग्रेश पार्टी यांना निवेदन*

हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

हिंगणघाट – मंगला ठक ( लांबट) काँग्रेस महीला तालुका अध्यक्ष हिंगणघाट द्वारे विनंती केले. महाराष्ट्रात आपली सरकार आहे. आणि मी वयाच्या 18 व्यां वर्षापासून गरीब , निराधार , अपंग , विधवा , पती पासून वेगळ्या राहत असलेल्या वर्गांसाठी योजनांचा लाभ मिळवून देणे व विविध कार्यातून व कार्यक्रमातून महिलांना सक्षम बनविणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, स्वाभिमानाने जाने,या प्रकारे एक ना अनेक कार्य करत आली आहे. हे सर्व करत असताना मला ज्या ज्या गोष्टी ची लोकांना आवश्यकता वाटते ते मी निवेदना द्वारे सरकारला देत आली आहे . तसेच माझा शेतकरी राजाचे अख्या आयुष्भर हाल होताना मी माझा डोळ्यांनी बघते आहे.


नेत्यांना मोठं मानधन आयुष्भर मिळते. तरीही पेंशन लागू होतो. शिक्षक व इतर क्षेत्रातील लोकांना तगडा पगार मिळतो. तरीही पेंशन मिळते. मग माझा शेतकरी राजा परिवारासह आयुष्भर राब राब राबतो कष्टानं पिकवते,अख्या जगाला व देशाला फोटभर अन्य पुरवितो. मग माझा शेतकरी राजाला पेंशन का मिळत नाही? .


1) 50 वर्षाच्या वरील शेतकर्याला व त्याचा पत्नीला 3 ,3 हजार मासिक पेंशन देण्यात यावे.

2) तसेच निरधरांची BPL ची उत्पन्न मर्यादा गेल्या बऱ्याच वर्षांपासून वाढलेली नाही.
ती 21000 रु.वरून वाढवून 50000 रु.उत्पन्न मर्यादा करण्यात यावे .
३)घरकुल योजना ड क्रमांकाची यादीतील अपंग , निराधार , एकटी महीला , एकटा पुरुष , विधवा व ज्यांना मुलबाळ नाही. असे ज्येष्ठ नागरिकांचे घरे पडून गेली, तरीही त्यांना घरकुल चा लाभ दिल्या गेला नाही, इतर योजना मध्ये घर असून बाकीच्यांना लाभ मिळतो असे गरजू लोकांना तालुका लेवलवर सर्व्हे करून घरकुल ड क्रमांकाचा यादीतून वगळून विशेष निधीतून करून देण्यात यावे .

४)मा. यशोमती ताई ठाकूर महीला व बालविकास मंत्री यांनी महीलाना सायकल देण्याचे ठरविले आहे .
सुशिक्षित व बेरोजगार प्रत्येक महिलेला वर्धा जिल्हात खास करून हिंगणघाट तालुक्या साठी एक सायकल व एक शिलाई मशीन द्यावी .

वरील विषयाच्या गरजा लक्षात घेता, अध्यक्ष या नात्याने माझा गरीब व निराधार जनतेच्या मागण्यांचा पाठपुरावा करून मंजूर करून द्याल. अशी निवेदना द्वारे विनंती करते.
मंगला ठक(लांबट)
अध्यक्ष

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …