Breaking News

*वराडा येथील ५४% जळालेल्या महिलेचा मुत्यु* *कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल*

*वराडा येथील ५४% जळालेल्या महिलेचा मुत्यु*

 

*कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वराडा येथील महिला सौ संगिता उईके ही घरी स्वयंपाक करतांना चुलीची आग साडीस लागुन जळाल्याने तिचा २२ दिवसांनी उपचारा दरम्यान मेडीकल नागपुर ला मुत्यु झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल करण्यात आला.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक १२ मे ला रात्री ९.३० वाजता च्या सुमारास वराडा येथील सौ संगिता आशिष उईके वय २७ वर्ष ही घरी चुलीवर स्वयंपाक करित असतांना अचानक साडीचा पदर चुलीवर पडुन आग लागुन तिचे कपडे व ती ५४% जळाल्याने प्रथम ग्रामिण रूग्णालय रामटेक ला उपचार करून नंतर मेडीकल कॉलेज नागपुर ला उपचारा दरम्यान गुरूवार दिनांक .३ जुन ला सायंकाळी ४ वाजता म्हणजे २२ व्या दिवसी तिचा मुत्यु झाला. सदर प्रकरणी सरकार तर्फे पोलीस हवालदार राजेश माकडे मेडीकल बुथ नागपुर यांची पोलीस स्टेशन चे सपोनि सतिश मेश्राम पुढील तपास करित आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …