*अनिल अनिल देशमुख यांनी घेतला आपल्या मतदार संघातिल कोरोना विषाणु संसर्गाच्या तिसर्या लाटेच्या परिस्थितीचा आढावा!*
*कायदा व सुव्यवस्थेवरही चर्चा*
*कोव्हिड १९च्या नियमावली चे सर्वांनीच पालन करावे (माजी मंत्री) आमदार अनिल देशमुखांचे आवाहन*
काटोल प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – राज्याचे माजी गृहमंत्री व काटोल विधानसभा मतदार संघा चे आमदार अनिल देशमुख यांनी आपल्या मतदार संघातील काटोल तालुक्यातील कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या तिसर्या लाटेच्या सुपरस्पेडिंग अनुषंगाणे उद्भभवनार्या परिस्थिति आणि कायदा सुव्यवस्था संबंधी मिशन ब्रेक द चेन या अभियानाअंतरगत काटोल तालुक्यातील परिस्थितीची माहिती घेण्याकरीता काटोल तहसील सभागृहात सोशल डिस्टंससींग चे पालन करत ११जुन चे दुपारी ०२-००वाजता कोरोना व खरिप पीकाचा आढावा बैठकिचे आयोजन करन्यात आले.

या प्रसंगी नागपुर जिल्हाधिकारी व विभाग आपत्ति व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष रिविंद्र ठाकरे यांचे उपस्थित उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंम्बरकर यांनी माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख यांचे समक्ष काटोल विधान सभा मतदार संघातील काटोल तालुक्यातील कोव्हिड१९ संसर्गित रूग्णांची १०जुन पर्यंत ची माहिती दिली. तसेच कोरोनाचे संभावित तिसर्या लाटेला थोपवायला लागनार्या उपाययोजनांच्या तयारी बाबद माहिती दिली. या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे इंडिकेटड आॅफिसर अजय चरडे, निलेश कदम, बी डी ओ संजय पाटील आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे ने ग्रा रु चे अधिक्षक दिनेश डावरे यांनी ही या प्रसंगी माहीती दिली .
या प्रसंगी माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी काटोल तालुक्यातील कोव्हिड १९च्या संभावित तिसर्या परिस्थितीला गांभीर्यांने घेण्याबाबद अनेक मार्गदर्शक सुचना दिल्या। तसेच नागरिकांनी सुद्धा सुपरस्पेडिंग कोविड १९ ला रोखण्या नागरिकांनी कोविड १९च्या नियमावली चे काटेकोरपणे पालन करून स्वताः व कुटूंबीयांना सुरक्षित ठेवू शकता, या करिता शासन व प्रशासनाला सहकार्य करन्याचे आवाहन ही या प्रसंगी अनिल देशमुख यांनी केले ।
या प्रसंगी काटोल पंचायत समिती चे सभापती उपसभापती पंचायत समीती सदस्य, काटोल नगर परिषद अध्यक्ष व नगर सेवक
,तसेच , उप विभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, तहसीलदार अजय चरडे, निलेश कदम, बी डीओ संजय पाटील , वैद्यकिय अधिक्षक डाक्टर दिनेश डावरे, डाक्टर सुधीर वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे , ठाणेदार महादेव आचरेकर, संबधीत विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते ।
या प्रसंगी कोरोना संसर्गापासून बचावात्मक उपाय व त्याची अंबलबजानी बाबद अनिल देशमुख यांनी उपस्थीतांशी चर्चे दरम्यान त्याचे मत जाणून घेतली व जन सहयोगात्मक अपील केली करन्यात आली ।

*कोव्हिड १९चे नियम दिशा निर्देशानुसार सर्वांनी सहकार्य करावे, पोलीस व राजस्व प्रशासनाला ब्रेक द चेन कोव्हिड १९च्या दिशा निर्देशचे पालन करावे या बाबद जनजागृति करावी अश्या सुचना ही दिल्या.
या प्रसंगी काटोल तालुका अन्न व नागरीपुरवठा अधिकारी कमलेश कुंभरे यांनी अन्न धान्य वाटपासंबधी माहीती दिली। तर कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांनी खरिप पीकाचा आढावा मांडला या प्रसंगी आमदार अनिल देशमुख यांनी सांगीतले की शेती पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शेतकर्यांना सर्वपरिने मदत करा. जे बैंकअधिकारि शेतकर्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात त्यांचे विरूद्ध कार्यवाही करन्याचे निर्देश ही या प्रसंगी दिले.
Maharashtra News Media सच की आवाज