Breaking News

*बोरडा शिवारीतील बीएसएनएल टावर च्या २४ बॅटरी चोरी* *कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

*बोरडा शिवारीतील बीएसएनएल टावर च्या २४ बॅटरी चोरी*

*कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा बोरडा शिवार येथे अमृते यांच्या शेतात लावलेले बीएसएनएल टावर च्या खाली असलेल्या काॅबिनेट चा अज्ञात आरोपी ने दरवाजा तोडुन अमर राजा कंपनी चे २४ बॅटरी किंमत १, ०८,००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मौजा बोरडा शिवार येथे दिंनांकद २ जुन २०२१ चे ११ वाजता ते दिनांक.८ जुन २०२१ चे २ वाजता च्या सुमारास फिर्यादी नामे सुशील कुमार लक्ष्मीप्रसाद पटेल वय ४२ वर्ष राहणार.प्लाॅट नं.२२० गणेश नगर नागपुर हा बीएसएनएल कंपनी मध्ये इलेक्ट्रीशियन चे काम पाहत असुन साईड डाऊन झाल्या मुळे अमृते यांच्या शेतात लावलेले बीएसएनएल टावर चेक केले असता टावरच्या खाली असलेल्या काॅबिनेट चा अज्ञात आरोपी ने राॅडनी दरवाजा तोडुन त्यामध्ये असलेले अमर राजा कंपनीचे एकुण २४ बॅटरी किंमत १,०८,००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. सदर प्रकरणी फिर्यादी सुशील कुमार लक्ष्मीप्रसाद पटेल यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कन्हान येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि कायदान्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपीचा शोध घेणे सुरु आहे व गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात नापोशि प्रविण चव्हान हे करीत आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …