*अज्ञात कारणावरून मजुरांचा घरात घुसून खून*
*खापरखेडा पो.स्टे.अंतर्गत पिपळा डागबंगला येथील थरार टिकासने केले वार ; अज्ञात आरोपी फरार*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर ःतालुक्याल खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळा डांग बंगला येथे बुधवार(९) ला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी टिकासने डोक्यावर व छातीवर वार करीत बांधकाम मजुराला ठार केल्याचे उघडकीस आले*
*संतोष गोकुल सोळंकी(५५) मृतकाचे नाव असून पिपळा रेल्वे स्टेशन लागत घर असुन मु्तक हा बांधकाम मजूर असल्याची माहिती आहे*

*मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी शेजारी असलेले बळीराम शेंडे गुरुवारला सकाळी सहा दरम्यान कामानिमित्त मृतकाच्या घरी बोलविण्यास गेले असता दार आतून लावून होते दार उघडून आत प्रवेश केला असता रक्तबंबाळ अवस्थेत मृताच्या डोक्यात व छातीवर टिकास चे वार केलेल्या मृतावस्थेत आढळला असता त्वरित शेजारी नागरिकांना बोलावून खापरखेडा पोलीस यांना माहिती दिली यावेळी खुनाची बातमी कळताच घटनास्थळी मोठ्या संख्येने वघ्याची एकच गर्दी उसळली तर माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी एस पी राकेश ओला एडिशनल एसपी राहुल माखणीकर ,डीवायएसपी मुक्तार बागवान ,खापरखेडा पोलीस निरीक्षक पुंडलिक भटकर,यांनी घटनास्थळी भेट दिली व गुन्हे शाखा,डॉग स्कॉट,पोलीस दल सह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी डेरा दाखल झाला*
*मृतकाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिति मेयो इस्पितळ नागपूर येथे पाठविण्यात आला असून अज्ञात आरोपी विरोधात कलम 452 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पिएसआय अभिषेक अंधारे तपास करीत आहे*
*मृतकाला दारूचे व्यसन असूनहा बांधकाम मजुराचे काम करून आपले उदरनिर्वाह करत होता मागील तीन महिन्यांपासून पारिवारिक वादामुळे तो घरात एकटाच राहत असून एकटेपणाचा फायदा घेत अज्ञात आरोपीने ठार करून पसार झाले मृतकला दोन मुली एक मुलगा व पत्नी असा परिवार असून शेवटचे वु्त्त हाती आले तोवर हत्ये मागचे गुढ़ मात्र स्पष्ट झाले नाही*
Maharashtra News Media सच की आवाज