*लसीकरणास भरघोस प्रतिसाद*
विशेष प्रतिनिधि
सावली – तालुक्यातील कढोली गावामध्ये आज दि. 14 ला झालेल्या कोविड 19 लसीकरणाला गावकऱ्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला व लसीकरण करून घेतले. लसीकर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कढोली आणि जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ तसेच प्राथमिक आरोग्य लोंढोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज कढोली येथील सरपंच कारडे आणि संस्थेचे तालुका समन्वयक रुपेश किरमे यांनी गावातील लोकांमध्ये लसीकरण जनजागृती केली. लोकांमध्ये असलेली कोविड 19 लसीकरणविषयी गैरसमज दूर करून त्यांना लसीकरण करण्यासाठी प्रेरित केले. त्यामुळे गावातील ११८ लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यामध्ये विशेष बाब म्हणजे तब्बल ४८ वयोवृद्ध व्यक्तींनी लसीकरण करून घेतले. एकीकडे लसीकरण करण्यासाठी नागरिक समोर येण्यास तयार होऊन नाही राहिले. तर कढोली येथील लोकांनी दिलेला प्रतिसाद लसीकरण कार्यास खूपच मोलाचं ठरलं आहे. त्यामुळे नक्कीच आजू बाजूच्या गावातील लोक सुध्या लसीकरण करून घेण्यास तयार होतील. यासाठी उपकेंद्र हरांबा यांनी सुध्या मोलाची भूमिका पार पाडली व लसीकरण करून घेतले. यामध्ये आरोग्य सेवक अनिल समर्थ, आरोग्य सेविका पाठक, CHO वृषाली थुल, CHO प्रगती रामटेके तसेच ग्रामपंचायत सरपंच किशोर कारडे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक हरमवार, कढोलीचे पोलीस पाटील कारडे, तलाठी झिटे साहेब, रुपेश किरमे तालुका समन्वयक जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ यांनी अथक परिश्रम घेऊन लसीकरण कॅम्प यशस्वी रित्या पार पाडला.
Maharashtra News Media सच की आवाज