*पोलीस पाटीलाला केले बडतर्फ*
*उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांची कारवाई*
सावनेरः सावनेर पो.स्टे.हद्दीतील सावंगी हेटी या गट ग्रामपंचायत अंतर्गत दोन्ही गावातील कायदा व सुव्यवस्था सुरळीतपणे हाताळण्यासाठी पोलीस पाटील म्हणून अनिल बाला बसारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.परंतु पोलीस पाटील यांच्या नियुक्तीपासुनच त्याच्या कार्यप्रणाली वर नागरिकात नाराजीचा सुर होता.
गावत वाढते अवैध व्यवसाय,वेळोवेळी घटना दुर्घटनेच्या माहीती वेळेवर न देने,गावातील लोकांच्या आपसी भांडनास वेगळे स्वरूप देणे,मनमर्जीने पोलीस पाटलाच्या दिमाखात नागरिकांना दुय्यम वागणूक देणे,पोलीस पाटील पदावर नियुक्तीपुर्व त्यांच्यावर असलेल्या अपराधीक घटनांची माहिती लपवीने यासारखे अनेक आरोप व तश्या स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून चौकशी करून व त्यांना आपले मत मांडण्याची मुभा देऊणही त्यांच्या कार्यप्रणालीत काही सुधारणा होत नसल्याने त्यांना दि.15 जुन 2021 रोजी सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 9 (च) अन्वये पोलीस पाटील अनिल बाला बसारी यास बडतर्फ करण्यात आले*