Breaking News

*जीवंत वीजवाहीनी च्या स्पर्शा मुळे 60 हजाराची बैलजोडी जागीच ठार ; बैलजोडी चा मृत्यू*

*जीवंत वीजवाहीनी च्या स्पर्शा मुळे 60 हजाराची बैलजोडी जागीच ठार ; बैलजोडी चा मृत्यू*


वार्ताहर कोंढाळी -दुर्गाप्रसाद पांडे
नागपुर – जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढासावळी चे शेतकरी पीक पेरणी करीता18जुन चे साकाळी 09-00वाजता वाई(बु)येथील आपल्या शेतावर बैलबंडीवर निघाले, 09-20ब
वाजता चे दरम्यान आपल्या शेताचे धुर्यावर पोहचताच धुर्यावरील आंब्याच्या झाडाची फांदी धुर्यालगतच्या वीज वाहीनी वर पडली फांदी वीज वाहीनीवर पडल्याने वीजवाहीणीच्या जिवंत तारा खाली पडताच शेतकरी बल्लू नारायण भोयल(39) बैलबंडी ही याच दरम्यान आंब्याखालून शेतावर जात असतांनाच खाली पडलेल्या जीवंत वीज प्रवाहीत तारांवर दोन्ही बंडीला जुंपलेल्या बैलजोडी चे दोन्ही बौल वीज प्रवाहाच्या जीवंततारावर पायांचा स्पर्श झाल्याने वीज प्रवाहाच्या तडाख्यात दोन्ही बैलांचा शेतकर्यां च्या नजरे समोरच जागीच मृत्यू झाला तर शेतकरी बल्लू भोयर ने बंडीवरून खाली उडी घेऊन आपला जीव वाचवला.
मानसुन चे आगमन झाल्याने शेतकरी आपल्या शेती पेरणी चे कामात लागला, कोंढासावळी चे शेतकरी बल्लू भोयर सुद्धा पेरणी चे तयारी ला लागले असतांनाच त्यांचेच शेताचे धुर्यालगत अचानक आंब्याचा फांदा वीजवाहीवर पडल्याने नैसर्गिक आपत्ती च्या तडाख्यात सापडून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर दोन्ही बैलांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शेतकरी बललू पुर्णतः खचला आहे. दैव बलत्तर म्हणून बोलावलेल्या शेतकर्याचे खरीप पीक पेरणीच संकटात सापडली आहे.
वाई(बु)येथील शेतकरी विजय तभाने यांनी ही माहीती पोलीस पाटील राजेंद्र कराळे यांना दिली माहिती मिळतातच पोलीस पाटील राजेंद्र कराळे व सरपंच संजय डफर यांनी घटनास्थळ गाठून या घटनेची माहीती कोंढाळी पोलीस स्टेशन, राजस्व व वीज वितरण कंपनीला दिली.
घटनेची माहीती मिळताच कोंढाळी चे ठाणेदार विश्वास पुलरवार यांनी सांगीतले यांनी हवालदार भोजराज तांदूळर व शिपाई नितेश डोकिरमारे , पशुधन अधिकारी डाक्टर लाडूकर, तसेच वीज वीतरण कंपनी चे अधिकारी घटनास्थळी पोहचून घटनास्थळ पंचनामा केला, या घटनेत मृत बैलजोडी ची किंमत साठ हजाराची असल्याचे सांगण्यात आले आहे. ऐन पेरणी चे हंगामाचे तोंडावर आकस्मिक (नैसर्गिक आपत्ती मधे)आपत्ती मधे सापडलेल्या शेतकर्याला वीज -व राजस्व तसेच नैसर्गिक आपत्ती विभागाकडून मो बदला मिळाल्यास बैलजोडी विकत घेऊन आपल्या कुटूंबाच्या उदरभरण करू शकेल असे गावकर्याचे म्हणने आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …