*रामटेक कीटस मधे एम्बेडेड सिस्टम वर 18 दिवसाचे ऑनलाइन वर्कशॉप संपन्न*
रामटेक प्रतिनिधि – ललित कनोजे
रामटेक – कीटस मधे रीसेंट ट्रेंड्स इन एम्बेडेड सिस्टम वर तीन टप्यात 18 दिवसाचे “ऑनलाईन इंडक्शन वर्कशॉप” कीटसच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्युनिकेशन विभाग तर्फे घेण्यात आले. वर्कशॉप 18 मार्च ते 24 मार्च, 27 मे ते 2 जून व 9 जून ते 15 जून ह्या काळात संपन झाले. या कार्यक्रमाचे प्रायोजक एआयसीटीई आणि आयएसटीई यांनी संयुक्त उपक्रम द्वारे केले. 9 जुनला तिसऱ्या टप्यातिल 6 दिवासीय ऑनलाइन कार्यक्रमाचे उद्घाटन आयएसटीईचे कार्यकारी सचिव डी. डी. वैद्य, यानी केले. एआयसीटीईचे संचालक कर्नल बी.व्यंकट यांचे हस्ते 15 जूनला कार्यक्रमाचे समापन झाले. यावेळी कीटसचे प्राचार्य डॉ. रामरतनलाल, समन्वयक व इलेक्ट्रॉनिक्स कॉम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ.पंकज आस्टनकर सहित आदि उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थितांनी त्यांच्या भाषणात सांगितले की प्रत्येकाचा जीवनशैलीमध्ये एम्बेडेड प्रणालीचे महत्व अनन्य साधारण आहे. एम्बेडेड प्रणालीनेच लेकइलेक्ट्रॉनिक्स कॉम्युनिकेशन, नेटवर्किंग, रोबोटिक्स क्षेत्रात अतिशय वेगवान अशी प्रगति झाली आहे। यांचा सबंधित उपकरने कल्पनेपेक्ष्या वेगवान गतिने काम करीत आहेत। या कार्यशाळेतून अभियांत्याना अपडेट तंत्रज्ञानची माहिती मिळेल. कार्यशाळेत देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील 50 हून अधिक प्राध्यापकांनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरटीईएस टीमचे प्रा. सुधीर खरड, प्रा. चंद्रशेखर कुर्वे, प्रा. वैशाली पांडे, प्रा. रुपाली सुरस्कर, प्रा. चंद्रकुमार थदानी, प्रा. प्रज्ञा गजभिये, प्रा. स्नेहल मलोडे, अर्चना महात्मे यांनि प्रयत्न केले.
Maharashtra News Media सच की आवाज