*कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल येथे गांधी जयंती उत्साहात साजरी*

कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल येथे गांधी जयंती उत्साहात साजरी

कोरपना प्रतिनिधि- संतोष मडावी

कोरपना तालुका हा आदिवासी गोरगरीब म्हणून ओळखला जातो येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा श्री जीवतोडे सर होते तर प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष कोरपना तालुका तथा उपसरपंच कन्हाळगाव तसेच गजभिये सर,श्री मानवर, इतर मान्यवर उपस्थित होते उप उपसरपंच नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा श्री लालबहादूर शास्त्री भारताचे तिसरे पंतप्रधान त्यांच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व आपल्या कलाकौशल्य तून भारताला अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह,चले जाव,भारत छोडो असे अनेक आंदोलन छेडून ब्रिटिशांना हद्दपार केले व दीडशे वर्ष आपण गुलामगिरीत होतो अशा तऱ्हेने 15 ऑगस्ट 1947 ला आपणाला स्वातंत्र्य मिळवून दिले तेव्हापासून आपला देश स्वातंत्र्य झाला राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा लालबहादूर शास्त्री यांचे देशाला मोठे योगदान आहे म्हणून आपल्या देशात या महान थोर पुरुषांची जयंती देशभर साजरी करण्यात येते तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी,कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन गजभिये सर यांनी केले तर आभार मनवर यांनी मानले

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …