Breaking News

*आंतरराष्ट्रीय योगा दिवस आभासी पध्दतीने उत्साहात साजरा*

*आंतरराष्ट्रीय योगा दिवस आभासी पध्दतीने उत्साहात साजरा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- तायवाडे महाविद्‍यालय महादूला-कोराडीतील शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना ,आय.क्यु.ए.सी.विभाग ,प्रियदर्शनी महीला महाविद्यालय वर्धा,डी.बी. सायन्स कॉलेज गोंदिया,एन.पी.डब्ल्यू. महाविद्‍यालय गाडेगाव -लाखणी,राजकूमार तिडके महाविद्यालय मौदा यांच्या सयुक्‍त विद्यमाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय योगा दिवस समारोह आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी श्री.भूषण टाके व श्री.मनोज शिर्के यांनी प्रात्याक्षिक दाखवून उपस्‍थित सर्व साधकांकडून योगा व प्रानायामाचा अभ्यास करवून घेतला.


या कार्यशाळेत प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे (तायवाडे महाविद्‍यालय महादूला),प्राचार्य रंभा सोनाये (प्रियदर्शनी महिला महाविद्‍यालय वर्धा),प्राचार्य डी.बी.कडव (एन.पी.डब्ल्यू कॉलेज,गाडेगाव) प्राचार्य डॉ.अभय भक्ते ( राजकूमार बाबूराव तिडके महाविद्यालय मौदा ) प्राचार्य डॉ.अंजन नायडू डी.बी.सायन्स कॉलेज गोंदिया या सर्वांनी सहभाग नोंदविला.
आॅनलाईन झूम अॅप वर या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमित टेंभुर्णे यांनी , प्रास्ताविक डॉ.सोनाली शिरभाते यांनी ,पाहुण्यांचा परिचय डॉ.सुधिर सहारे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.हरिष मोहिते यांनी मानले. या आॅनलाईन कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील भोतमांगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर घोरमाडे यांनी सहकार्य केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …