*१८ वर्षावरील लसीकरणाला सुरुवात*
*चला लसीकरण करूया कोरोना वर मात करूया*
*लसीकरणासाठी युवकांचा उत्साह शिगेला*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र मोवाड
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्य सरकारने आजपासून ते १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. आज दिनांक २२ जून पासून मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला महाराष्ट्रात सुरूवात झाली होती.परंतु मध्यंतरी लसीकरण थांबविण्यात आले होते. केंद्र शासनाने आता राज्य सरकारला वयोगट ठरविण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने १८ ते ४४ गट निश्चित केला असून आजपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
शहरातील युवकांनी लसीकरणात सहभागी व्होण्यासाठी मोठी गर्दी केली. शहर कोरोनामुक्त होण्यासाठी युवक मदतीचा हात देत आहे.
१८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी व शहर कोरोना मुक्त करावे असे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण अमरगेकर यांनी सांगितले .लस पूर्णतः सुरक्षित आहे. कोरोनाला मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे.डोक्यातील संभ्रम दुर करून.
Maharashtra News Media सच की आवाज