Breaking News

*हिंगणघाट च्या, माता मंदिर देवस्थानला ” क “वर्ग दर्जा प्रदान* *पर्यटन व रोजगाराला वाव मिळणार*

*हिंगणघाट च्या, माता मंदिर देवस्थानला ” क “वर्ग दर्जा प्रदान*

*पर्यटन व रोजगाराला वाव मिळणार*

वर्धा जिल्हा प्रतिनीधी – भाऊराव कोटकर
हिंगणघाट- येथील आई उर्फ माता मंदिर देवस्थानला महाराष्ट्र शासनाने तिर्थक्षेत्रचा “क” वर्ग दर्जा प्रदान केला आहे. पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला.
यापुढे मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना मंदीरा तर्फे सुविधा प्राप्त होईल तसेच पर्यटनाला वाव मिळून रोजगार निर्माण होणार आहे.
माता मंदिर देवस्थान हे पेशवेकालीन मंदिर असून विदर्भातून भाविक तिथे दर्शनाला येतात. आपल्या सर्व मनोकामना माता पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराला ” क” वर्ग दर्जा मिळावा यासाठी माता मंदीर देवस्थान चे अध्यक्ष श्री गणपत गाडेकर यांनी ही मागणी लावून धरली होती. यासाठी आमदार रामदासजी आंबटकर यांनी सतत पाठपुरावा करीत अथक प्रयत्न केले.

पालकमंत्री सुनीलजी केदार, खासदार रामदासजी तडस, माजी मंत्री सुधीरजी मुनगंटीवार,आमदार रामदासजी आंबटकर,आमदार समीरजी कुणावर, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी व नगरपालिका नगरसेवक या सर्वांचे देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री गणपत गाडेकर, तसेच विस्वस्त रमणिक शेषपाल,संजय मॅडमवार, राधेश्याम श्रीवास, पुरुषोत्तम मावळे, प्रा. सूर्यकांत मावळे, चंद्रकांत साटोणे यांनी आभार व्यक्त केले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …