Breaking News

*अंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा*

*अंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा*


नागपुर – महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी लि.खापरखेडा व पतंजली योग समीती खापरखेडा यांचे संयुक्त विद्यमाने राम मंदिर प्रकाश नगर खापरखेडा येथे ७ वा अंतरराष्ट्रीय योग दिन २१ जुन २०२१ रोजी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डाँ. अनिल काठोये उप मुख्यअभियंता,खापरखेडा औष्णिक विद्दुत केंन्द्र यांचे हस्ते दिपप्रज्वलन व उदघाटन झाले.

स्वागत गित मुख्याध्यापक सौ यशश्री ठाकरे यांनी घेतले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अमरचंदजी जैन तालुका पालक संरक्षक पतंजली योग समीती खापरखेडा यांनी घेतले,स्वागत समारोह नंतर योग मार्गदर्शन श्री लक्ष्मण काळे प्रखंड प्रभारी व तालुका सहप्रभारी भारत स्वाभिमान न्याँस खापरखेडा व श्री रंगराव ठाकरे प्रखंड प्रभारी व तालुका सहप्रभारी पतंजली योग समीती खापरखेडा .

तसेच श्री प्रतीक करंडे तालुका मिडीया प्रभारी पतंजली योग समीती खापरखेडा यांनी सुक्ष्म व्यायाम,बैठक स्थिती मधील आसने,पोटाचे बलावरील आसने,शयन स्थिती मधील आसने,व दंड स्थिती (उभे राहून )आसने घेतले, प्राणायाम घेतले व श्री बंडु मेश्राम तालुका प्रभारी, किसान सेवा समीती खापरखेडा यांची विशेष उपस्थिती होती,श्री नरेश तरारे गुरुजी यांनी आयुर्वेदाबद्दल सविस्तर माहीती दिली व सहयोग शिक्षक श्री श्रीनिवास नमलेवार व ऱाजु सिंगम व श्रीमती ललिता ताई वानखेडे,सौ. सोनकुसरे ताई,उज्जवला ताई राऊत,सौ गिता ताई ठाकरे , श्री पटमासेजी वरीष्ठमार्गदर्शक,सारीका ताई,व सावरकर ताई यांची वअनेक साधक यांची विशेष उपस्थिती होती कार्येक्रमाचे शेवटी श्री पटमासे काकाजी यांनी आभार प्रदर्शन केले,शांतीपाठ घेऊन वर्गाचे समापन केले व शेवटी सर्वांना आयुर्वेदीक काढा व पतंजली बिस्कीट वितरण केले.हा कार्यक्रम ऑनलाईन सुध्दा जुळलेला होता. 

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …