*कन्हान – कामठी येथे योग दिवस थाटात साजरा*

*योग दिवसा निमित्य योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांचा सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे योग दिवसा निमित्य योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून योग दिवस साजरा करण्यात आला.
चेतनात्मक ध्यान योग केंन्द्राचे योग शिक्षक मधुकरजी धोपाडे हे ८० वर्षा च्या वर असुन आज ही नागरिकांना योग शिकवत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी त्यांच्या घरी जाऊन योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करून योग दिवस साजरा करण्यात आला . याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, अखिलेश मेश्राम, प्रविण माने सह मंच पदाधि कारी प्रामुख्याने उपस्थित होते.
*करे योग रहे निरोग – मधुकरजी धोपाडे*
यावेळी योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांनी योग दिवसा निमित्य मार्गदर्शन केले कि, योग म्हणजे जोडणे आपण आपल्याला आपल्या स्वास्थासाठी जोडतो. योग करणे फार गरजेचे असुन स्वस्थ
राहण्यासाठी योग करणे फार गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी सकाळी उठुन योग करायला पाहिजे. त्यामध्ये योग , प्राणायम आणि आस्ना हे सर्व त्याचे जोड असुन स्वस्थ राहण्यासाठी प्रत्येकांनी सकाळी उठुन योग करायला पाहिजे. असे कडकडीचे भावनिक आवाहन योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांनी नागरिकांना केले आहे.
*कामठी येथे अंतरराष्ट्रीय योग दिवस भाजपा ने विभिन्न संस्था सोबत केला साजरा*
कामठी – अंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्य कामठी शहर भाजपा द्वारे अनेक विभिन्न संस्था सोबत योग आसन करून योग दिवस साजरा करण्यात आला असुन गायत्री उपवन पोरवाल पार्क, भागूबाई समाज भवन, माँ शारदा ज्ञान मंदिर, योगासन ध्यान केंद्र महादेव घाट येथे योग साधक सोबत भाजपा पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी योग करून योग दिवस साजरा केला .
संस्थेचे योग शिक्षक श्री नीलेश अग्रवाल,(गायत्री परिवार), श्री प्रकाश इटनकर(भागूबाई भवन),श्री प्रभु नवघरे (माँ शारदा ज्ञान मंदिर), श्री. प्रकाश सुखीजा(योगासन ध्यान केंद्र महादेव घाट) हयांनी योग आसन चे उपस्थितांना धड़े देत जीवनभर योग करण्याचा संकल्प साधकां कडून करून घेतला . या प्रसंगी भाजपा कामठी शहर अध्यक्ष श्री संजय कनोजिया, श्री लाला खंडेलवाल, श्री विमल झमतानी, श्री लालू यादव, श्री लालसिंग यादव, श्री सुनील खानवानी, राज हाड़ौती, श्री राजेश देशमुख श्री द्वारका पारवानी, श्री उज्ज्वल राइबोले, श्री रमेश वैद्य, श्री मंगेश यादव श्री विनोद संगेवार श्री लकीसिंघ चावला, श्री नरेश पारवानी, श्री प्रमोद वर्णम, श्री सतीश जैस्वाल, श्री मोंटू बुटानी, श्री बिट्टू हिरणवार, श्री हर्ष खंडेलवाल, श्री द्वारका पारवानी श्री बबलू रोचलानी इत्यादि सोबत गायत्री परिवार चे श्री चंद्रशेखर मेश्राम, श्री आकाश टोहने, श्री मनोज इटनकर, श्री किशोर जांगड़े, श्री पुरुषोत्तम बावनकर, भागूबाई सभागृहचे प्रकाश इटनकर, श्री चकोले, माँ शारदा ज्ञान मंदिर चे श्री प्रभु नवघरे, योगासन ध्यान केंद्र चे श्री महेंद्र वाही, श्री महादेवराव वैद्य, श्री महेश अग्रवाल, श्री विजय तड़से डॉ विवेक चंदनानी,श्री विवेक नशीने, इत्यादि उपस्थित होते. योग दिवसाची भाजपा द्वारे जिम्मेदारी श्री राजेश देशमुख़ महामंत्री भाजपा शहर कामठी, व श्री द्वारका पारवानी हयांनी सर्वांचे आभार मानत सर्वांनी योग करून निरोग राहण्यासाठी नेहमी योग करावे असे कडकडीचे आव्हान केले.
Maharashtra News Media सच की आवाज