*१८ वर्षा वरील सर्व नागरिकांचे २३ जुन पासुन लसीकरण सुरू*
*सर्व नागरिकांनी लसीकरण अवश्य करावे –
कन्हान-पिपरी चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरे यांचे नागरिकांना आवाहन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरातील प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नियमित कोव्हिड- १९ प्रादुभाव रोखण्याकरिता शासना व्दारे ४५ वर्ष व त्यावरील सर्व नागरिकांना निशुल्क लसीकरण मोहीम राबवुन लस लावणे सुरू असुन.

शनिवार (दि.१९) जुन २०२१ पासुन ३० वर्षा वरील आणि आता बुधवार (दि.२३ ) जुन २०२१ पासुन १८ वर्षा वरील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान, उपकेंन्द्र सिहोरा, उपकेंन्द्र पिपरी येथे कोव्हिड-१९ लसीकरण मोहीमे अंतर्गत लस लावणे सुरू कऱण्यात येणार असुन दररोज सुरू असल्याने कन्हान-पिपरी नगररिषद अंतर्गत शहरातील सर्व १८ वर्षावरील व त्यावरील ज्या नागरिकांनी आता पर्यंत लस लावली नाही. अश्या सर्व नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंन्द्र, कन्हान येथे आधारकार्ड किंवा ओळख पत्र व मोबाईल क्रंमाक सोबत घेऊन जावुन मोफत कोव्हिड-१९ लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगरपरिषद कन्हान-पिपरी चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरे हयांनी केले असुन कोव्हिड – १९ लसीकरणा बाबत काही अडचणी आल्यास १) कार्यालय अधिक्षक- सुशांत नरहरे मोबाइल नंबर ८३२९६२४१ ४६ , २) शहर समन्वयक – संकेत तालेवार मोबाइल नंबर ९१५८७८६६७२, ३) लेखापाल- पंकज खवसे – मोबाइल नंबर ८७६६७३५६७१ यांचेशी किंवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा .
Maharashtra News Media सच की आवाज