Breaking News

रामटेक येथे रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात “स्वच्छता हीच सेवा “कार्यक्रम संपन्न

रामटेक येथे रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात “स्वच्छता हीच सेवा “कार्यक्रम संपन्न

*स्थानीय प्रतिनिधी*

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यांचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य मा. रविकांत रागीट आणि संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका जयश्री ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय आणि दमयंती ताई देशमुख डी.एड बी.एड अध्यापक विद्यालयात “स्वच्छता हीच सेवा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिका ठकरेले या विद्यार्थिनीने केले असून प्रास्ताविक डॉली मॅडम तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्रा.ज्ञानेश्वर नेवारे यांनी “महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर “प्रकाश टाकला तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रेमानंद हटवार यांनी “स्वच्छ भारत अभियानात महात्मा गांधीजींचे विचार आणि युवकांची भुमिका”या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा. चेतना ऊके यांनी म. गांधीजींच्या ऐतिहासिक कार्यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या बरोबर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. दिलीप गिरडे आणि डी.एड बी.एड विभाग प्रमुख प्रा.नाईक यांनी महाविद्यालयातील वर्गखोल्या, सभोवतालचा परिसर आणि वाचनालय ,ब्रह्मांड सभागृह, अवतीभोवतीचा संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतले. कार्यक्रमाचे आभार नलिनी कुर्वे या विद्यार्थिनींनी मानलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वानखेडे मॅडम, प्रा.अनिल मिराशे,प्रा. प्रशांत सरपाते, बुरडकर सर आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …