*कामठी येथे डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथि बलिदान दिवस म्हणुन साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी – भाजपा कामठी शहर द्वारे जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन भाजपा कार्यालय येथे करुन डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथि बलिदान दिवस म्हणुन साजरी करण्यात आली .
बुधवार दिनांक २३ जुन ला भाजपा कामठी शहर द्वारे जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्य कामठी भाजपा कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया यांचा हस्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, एक देश मे, दो प्रधान, दो निशान, दो विधान नही चलेंगे समर्पण, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक म्हणजे काश्मीरसाठी संपूर्ण आयुष्याचे बलिदान देणारे हे नेतृत्व आजही लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे असे त्यांनी नमुद केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथि बलिदान दिवस म्हणुन साजरी करण्यात आली . या प्रसंगी राज हडोती , लालसिंग यादव , लाला खंडेलवाल ,पंकज वर्मा ,नरेश पारवानी , कमल यादव ,विक्की बोंबले ,सतिश जैस्वाल , प्रमोद वर्णम ,अजय पंचोली , राजेश देशमुख , पुनीत रुंगठा , दिनेश स्वामी , बंटी पिल्ले , सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज