*प्राथमिक आरोग्य केंद्र डोरली ला मिळाले अक्सिजन काॅन्सट्रेटर*
*निमखेडा उपकेंन्द्राला आॅक्सीजन काॅन्सट्रेटर प्रदान*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी – तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंन्द्र डोरली ला कोरोना बाधितांना तातडीने प्राणवायू मिळाला तर अनेकांचे जीव वाचु शकतात हेच बाब लक्षात घेत प्राथमिक आरोग्य केंन्द्रा चे ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर देण्याचा निर्णय श्री श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी घेतला होता त्यानुसार डोरली प्राथमिक आरोग्य केंन्द्रास प्रदान करण्यात आले. या प्रसंगी श्री श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे , डॉक्टर अश्विनी फुलकर, रणजीत गजभिये, अतुल हजारे ,जयराम मेहरकुडे ,कमलाकर मेंघर, प्रकाश वांढे, राजेश कडु रामभाऊ दिवटे, रिंकेश चावरे ,सरपंच शीतल येवले, चक्रधर महाजन, हिरमान मारबते, सुनिता इंगोले, पांडुरंग कानडे देवराव खंडे कमलाकर आंदळकर इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते . पारशिवनी तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंन्द्रात कोरोना बाधितांचे ना तात्काळ प्राणवायू मिळावा म्हणून श्री श्री फाउंडेशन च्या वतीने ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेकर देण्याचा उपक्रम श्री संकेत बावनकुळे यांनी हाती घेतला आहे त्यानुषंगाने डोरली प्राथमिक आरोग्य केंन्द्रात ही सयंत्र द्यावे. अशी लोकहितवादी भूमिका जिल्हा परिषदेचे माजी माजी सदस्य कमलाकर मेघंर, यांनी मांडली होती त्यांची ही भूमिका पाहता श्री श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी तत्काळ डोरली प्राथमिक आरोग्य केंन्द्रात ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन प्रदान केली.

*निमखेडा उपकेंन्द्राला आॅक्सीजन काॅन्सन्ट्रेटर प्रदान*
मौदा – मौदा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असुन शासनाने अनलाॅक जाहिर केले असुन तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेत नागपुर येथील एरीज अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातुन मौदा तालुक्यातील निमखेडा प्राथमिक आरोग्य उपकेंन्द्राला आॅक्सीजन काॅन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करण्यात आली . या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे , एरीज अॅग्रो कंपनीचे संतोषकुमार पांडे , रुपेश गावंडे , धनराज चारोडे , रोशन भांडवलकर , योगेश उमप , आशिष सोलन , क्रिष्णा चदलवाडा , ज्ञानेश्वर चौरे , प्रमोद बरबटे , सुरेश सज्जा , डॉ तृप्ती शिंदे , लतिका शिंगाडे , आरोग्य सेवक , आत्राम , रमना मदयपाटी , विनायक महादुले , अनिल पायतोडे , सुनील दारोडे , कमलेश महादुले , दिनेश टाकरखेडे , मुकेश कांबळे आदि उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज