Breaking News

*बोरडा (गणेशी) गावात व्यायामशाळा (जिम) चे लोकार्पण.*

*बोरडा (गणेशी) गावात व्यायामशाळा (जिम) चे लोकार्पण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – गोंडेगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत बोरडा (गणेशी) गावात विरोधी पक्ष उपगट नेता व जिल्हा परिषद सदस्य व्यंकटजी कारेमोरे यांच्या पर्यंत्नातुन बोरडा गावात जिम साहित्य देऊन व्यायाम शाळेचे लोकार्पण करण्यात आले.


गोंडेगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत बोरडा (गणेशी) या गावी विरोधी पक्ष उपगट नेता व जिल्हा परिषद सदस्य वेंकटजी कारेमोरे यांचा अथक प्रयत्ना ने जिल्हा क्रीड़ा संकुल यांचा माध्यमातुन व्यायाम शाळे करिता (जिम) ला लागणारे साहित्य देण्यात आले. आणि या व्यायाम शाळेचे (जिम) चे जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष उपगट नेता वेंकटजी कारेमारे हयांच्या हस्ते उदघाटन करून लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी बोरडा सरपंच मनोहर डडुरे, सदस्य राजु डडुरे, धर्मेंद्र गणवीर, संदीप बंड, मंगेश बालकोटे, निरंजन बालकोटे सह गावातील युवा व नागरिक प्रामुख्याने उपस्थित राहुन व्यंकटजी कारेमोरे यांचे आभार व्यक्त केले .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …