Breaking News

*तिसर्या लाटेला थोपवायला आरोग्य विकास निधीची गरज*

*तिसर्या लाटेला थोपवायला आरोग्य विकास निधीची गरज*

कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी- दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या ठिकाणी तिसर्या लाटेला थोपवायला किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्याची मागणी सोबतच येथील या भागाचे आमदार राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जि प नागपुर आरोग्य समिती चे सदस्य सलील देशमुख यांनी ग्रामिण रूग्णालय चे अपुर्ण बांधकाम पुर्ण करण्याबाबत आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य विकास कार्य निधी ची मागणी केली आहे कोविड संक्रमण प्रतिबंधात्म काळात येथील ग्रामिण रूग्णालया करीता राज्य व केंद्र सरकार कडून आरोग्य विकास बांधकामनिधी आरोग्य विभागाने उपलब्ध करून देण्याची मागणी कोंढाळी ग्रा प चे सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्निल व्यास ज्येष्ठ ग्रा प सदस्य संजय राऊत कमलेश गुप्ता, तसेच ग्रा प चे सस्यांनी केली आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …