*जंगलात सिड्सबॉल व बीजरोवणी उपक्रम*

*वनविभाग व पर्यावरणप्रेमींच्या संयुक्त विद्यमाने मटकाझरीच्या जंगलात बीजरोवणी व सिड्सबॉल उपक्रम*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- शहरात ग्रामीण भागात विकासाच्या नावावर, वाढत्या आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस झाडांची कत्तल, झुडपी जंगलांचा सर्वनाश होत असल्यामुळे वन्यजीवांच्या जीवांवर बेतत आहे. वन्यप्राण्यांचा हकनाक बळी जात आहे तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमी पर्यावरण सरक्षणासाठी वृक्ष लागवड, जंगलातील पशुपक्ष्यासाठी सिड्सबॉल अभियान राबवून पर्यावरण संतुलनासाठी हातभार लावत आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलातील पशुपक्ष्यांच्या हिताकरिता सिड्सबॉल उपक्रम व बीजरोवणी उपक्रम राबविण्यासाठी स्वप्नील बोधाने सोशल मीडियावर बियांच्या मदतीकरिता आहवान करतात. त्यामुळे ह्या उपक्रमाकरिता अनेकांनी बियांची मदत केली ज्यात श्री. संजयजी पुगलिया, पशुचिकित्सक श्री. सुशीलजी पांडव, स्वप्नील बोधाने, पंकज देव्हारे, कल्याणी नागलकर, क्रीस्टो कुमार, चिरायू बरडे, अभिजित धाबेकर, प्रथमेश विंचूरकर यांचा विशेष सहभाग होता.
जंगलातील वन्यप्राणी आसपासच्या शेतावर ताव मारू नये याकरिता पशुपक्ष्यांना सुद्धा जंगलातच विविध फळांचा, पौष्टीक गवतांचा, चारावर्गीय झाडांचा आस्वाद घेता यावा म्हणून हा उपक्रम राबविण्याचा यामागचा उद्देश आहे.
ह्या उपक्रमासाठी पशुप्रेमींनी असंख्य बीजगोळे तयार केले व जंगलात 5-6 km भ्रमण करून बीजगोळे टाकलेत व बीजरोवणी केली.
हा सिड्सबॉल व बीजरोवणी उपक्रम वनपरिक्षेत्राचे सहायक वनसंरक्षक (ACF) श्री.नरेंद्रजी चांदेवार, श्री.अजिंक्यजी भटकर (वाईल्ड लाईफ वार्डन), श्री. देऊरकर (RO) ह्यांच्या दिशानिर्देशांत राबिण्यात आला असून ह्या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी विशेषता वनविभागाचे कर्मचारी शेंडे मॅडम, काळे मॅडम, सोनटक्के मानकर, लोणारे तसेच पर्यावरणप्रेमी संस्थांचे आशिष कोहळे, निलेश रामटेके, निखिल निमसटकर, अंकित खलोडे, अनिकेत सुरुशे, कौस्तुभ नागलकर, अश्विन गट्टानी, सागर बावनकुळे, नितीन दहापुते, श्रीकांत अंबरते, सचिन काकडे, पवन बावणे, पंकज राऊत, अक्षय बोडखे, वैभव देधिया, विश्वा गंगार, आकाश हसोरिया, शुभम पराळे, नीरज मोहारकर, PFA unit 2, worrc org. चा विशेष सहयोग होता.

*खूपच सुप्त उपक्रम आपण सर्वांनी दरवर्षी बीज संकलन करायला हवे. या उपक्रमाद्वारे विविध झाडांची माहिती होते तसेच स्थानिक झाडांची लागवड करण्याकरिता मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृक्षारोपणा बाबत कृतिशील जनजागृती होते.*
*- अजिंक्य भटकर, मानद वन्यजीव रक्षक, नागपुर*
Maharashtra News Media सच की आवाज