Breaking News

*रामटेक येथे ‘एक आठवण आपल्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात* *विकासदूतांनी दिले अधिकाऱ्यांना निवेदन*

*रामटेक येथे ‘एक आठवण आपल्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात*

*विकासदूतांनी दिले अधिकाऱ्यांना निवेदन*

रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी.
रामटेक – येथे त्रिशरण एनलाइंटमेंट फाउंडेशन या संस्थेअंतर्गत ‘एक आठवण आपल्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.यासाठी रामटेक तालुक्यातील विकासदूतांनी उपविभागीय अधिकारी रामटेक,वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी,पंचायत समिती रामटेक तसेच गावातील ग्रामपंचायतींना निवेदन दिले.’एक आठवण आपल्या दारी’ या उपक्रमाची सविस्तर माहिती अशी की,गेल्या वर्षभरात रामटेक तालुत्यात जवळपास 88 व्यक्ती मरण पावलेत.याच व्यक्तींची एक आठवण म्हणून त्याच्या घरासमोर विकासदूतांच्या मदतीने वृक्षरोपन करून त्यांना एक आठवण म्हणून ते झाड जगवायचे आहे.

या सर्व गोष्टी करत असताना विकासदूत याकडे विशेष लक्ष देणार आहेत की,ज्या घरचे व्यक्ती कोरोनामुळे मरण पावलेत अशा परिवाराला शासकीय योजना मिळवून त्यांना आधार देण्याचे संपूर्ण काम विकासदूत करणार आहे.यासंदर्भात रामटेक येथील उपविभागीय अधिकारी,वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी, पंचायत समिती रामटेक व अनेक ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात आले.त्यावेळी रामटेक तालुक्यातील विकासदूत पंकज चौधरी, विक्की ठवरे,सतीश साकोरे, रामकृष्ण बाळापुरे, विशाखा पाटील,पायल शेंडे,चंद्रशेखर तागडे तसेच रामटेक तालुका समन्वयक नरेंद्र सोमकुवर उपस्तीत होते.वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी यांनी वृक्षारोपण करण्यास 100 झाडे देण्याचे सांगितले आहे. तसेच बोथिया-पालोरा ग्रामपंचायत येथील ग्राम विकास अधिकारी श्री.नारायण कुंभलकर यांनी सुद्धा विकासदूतांच्या कार्याची प्रशंसा करत झाडे उपलब्ध करून देण्याचे आस्वासन दिले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …