Breaking News

*एक आठवण आपल्या दारी*

*एक आठवण आपल्या दारी*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेरः त्रिशरण एलाइनमेंट फाउंडेशन , पुणे संस्थेच्या मुख्य संचालक मा. प्रज्ञा वाघमारे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रकल्प संचालक दिगंबर वाघ यांच्या आदेशानुसार व विभागीय समन्वयक प्रारूप बोजरे यांच्या मार्गदर्शनानुसार दि. *13 जुलै रोजी सकाळी 11 वा.नागपुर जिल्हा सावनेर तालुक्यातील काही निवडक गांवात येथील मुख्य न्यायाधीश डॉ. दीपक डोंगरे त्रिशरण फाउंडेशन या संस्थेच्या वतीने “एक आठवण आपल्या दारी” ही संकल्पना राबवत कोरोना मधे मृत झालेल्या व्यक्तीला मानसिक आधार मिळेल आणि एक सकारात्मक वातावरण तयार होईल व त्या व्यक्तीच्या दुःखात सहभागी होण्याच्या उद्देशाने ही वृक्ष लागवड करण्यात आली.


या कार्यक्रमात तालुका समन्वय रीता ठाकरे तालुक्यातील विकास दुत,माधुरी रोहनकर, पंकज खोरगळे, उत्तम राऊत, निखिल वासुरके, गणेश रोहनकर, अश्विनी कुबडे, सुरज पाल, आकाश बोडे, आमप्रकाश बेल, अश्विनी गुरकर यांच्या सहभागाने हा प्रकल्प खूप चांगल्या प्रकारे पार पाडला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …