*विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने मादा माकडाचा मृत्यू ; नवजात माकड अनाथ*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले
नागपुर:- नागपूर पासून 15 km दूर कोराडी परिसरात झुडपी जंगले व मोठे विद्युत प्रकल्प, तलाव परिसरातील झुडपे असून त्यात वन्यजीवासाठी पोषक वातावरण उपलब्ध असल्यामुळे नेहमीच माकडे (monkeys) व अन्य वन्यजीव मोठ्या संख्येत उघड्या डोळ्याने पाहायला मिळतात पण हे ही तितकेच खरे की या भागात अनेकदा रस्ते अपघातात व विद्युत प्रवाहाच्या झटक्याने अनेक वन्यजीव जख्मी अथवा मृत्युमुखी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मादा माकड मृत्यमुखी पडल्याची अशीच एक दुर्दैवी घटना कोराडी शिवारात घडली. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार कळले की सकाळच्या सुमारास असंख्य माकड आपल्या परिवारासह 33 KV सबस्टेशन परिसरात दाखल झाले होते त्यातील एक मादा माकड आपल्या नवजात पिल्यासह विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने जमिनीवर आदळले. ही घटना पाहणाऱ्यांमधून बावनकुळे नावाच्या गृहस्थाद्वारे ही माहिती पर्यावरणप्रेमी आशिष कोहळे (people FOr animal unit 2) ला कळताच घटनास्थळी धाव घेऊन माकडाची पाहणी केली परंतु विद्युत प्रवाहाच्या झटक्यात मादा माकड मरण पावली होती तर तिचं पिल्लू सुद्धा जख्मी झाले होते व वेदनेने विव्हळत होते. ही हृदयविकारक घटना जनबंधु, डाखोळे, साबळे ह्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर घडल्यामुळे त्यांचे डोळे सुध्दा पाणावले होते.
ह्या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील उपचार व देखभाल करिता पिल्याला आपल्या ताब्यात घेतले.
Maharashtra News Media सच की आवाज