*सिंगम सिक्योरिटी गार्डच्या सतर्कतेने लोंखडी सळाख व पाईप चोरी पकडली* *एकुण १४,५२० रूपयांचा मुद्देमाल चोरी प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल*

*सिंगम सिक्योरिटी गार्डच्या सतर्कतेने लोंखडी सळाख व पाईप चोरी पकडली*

*एकुण १४,५२० रूपयांचा मुद्देमाल चोरी प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – गोंडेगाव ते भानेगाव कन्वेयर बेल्टचे काम आय.एस.जी.ई.एल कंपनी करित असुन येथे मोठ मोठ्या लोंखडी सळाखी, पाईप ची चोरी होत असल्याने सिंगम सिक्युरिटी लावण्यात आल्याने सिंगम सेक्युरिटी चे मुख्य रवि सिंघम, मार्गदर्शक व ट्रेनर चंद्रशेखर अरगुलेवार आणि सुरक्षारक्षक धर्मेंद बावने, टिकाराम छानिकर च्या सतर्कतेने तीनचाकी वाहनात लोंखडी सळाख व पाईप चोरी करून नेतांना पकडुन कन्हान पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
गोंडेगाव ते भानेगाव घाटरोहना गोंडेगाव परिसरात कन्वेयर बेल्टचे काम आईएसजीईएल कंपनी करित असुन येथे मोठ मोठया लोंखडी सळाखी, पाईप ची चोरी वाढल्याने सिंगम सिक्युरिटी ला दिनांक १७ जुन २०२१ पासुन लावुन सुरक्षा कडक करण्यात आली. प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक .९ जुलै २०२१ ला सकाळी ८ वाजता दरम्यान सिंघम सेक्युरिटीचे सुरक्षा रक्षक धर्मेंद बावने व टीकाराम छानिकर कर्तव्यावर असतांना तीन चाकी वाहन क्रमांक. एमएच ४९-डी – ४८७३ चा चालक शाहु राहणार. कळमना रोड शनिमंदीर जवळ यास चारचाकी वाहन घेऊन जाताना थांबवुन पाहिले असता लोंखडी सळाखी, पाईप असल्याने चालक शाहु यास विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की , घाटरोहणा येथुन ३०० किलो लोंखड १० हजार रूपयात विकत घेऊन आणले आहे. हा माल कंपनीचा असल्याने सुरक्षा रक्षकांनी चंद्रशेखर अरगुलेवार यांनी फोनवर सांगितल्याने चंद्रशेखर अरगुलेवार हयांनी फोन करून कन्हान पोलीस स्टेशन चे उप निरिक्षक महादेव सुरजुसे हयांना घटनेची माहीती देताच तातडी ने गोंडेगाव घटनास्थळी पोहचुन टाटाएस चारचाकी वाहन व चालक यांना ताब्यात घेत कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. कन्हान पोलीसांनी आयएसजीईएल कंपनी चे सुरेशकुमार वैध यांच्या तक्रारी वरून कन्वेयर बेल्ट च्या कामाचे २० वर्टीकल पाईप किंमत ८००० रूपए , टी एमटी लोंखडी बार १२ (३२ एमएम) किंमत ५७६० रूपए , टीएमटी लोंखडी बार १० (१६ एमएम) किंमत ४०० रूपए, लोंखडी शिंकजे ७ किंमत २८० रूपए, युज्याक २ किंमत ८० रूपए असा एकुण १४,५२० रूपयाचा मुद्देमाल चोरी केल्या प्रकरणी आरोपी विरूध्द अपराध क्रमांक २५३/२१ कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे, हेड कांस्टेबल जियालाल सहारे, विरेंन्द्र सिंग चौधरी, प्रकाश वर्मा हे करीत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …