*कन्हान येथे एका युवका ने युवतीचा केला विनयभंग*
*फिर्यादी पीडितेचा रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी ला अटक करुन पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत स्वामी विवेकानंद नगर येथे एका युवका ने फिर्यादी पीड़ीतेचा विनयभंग केल्याने फिर्यादी पीड़िते च्या रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी ला अटक करुन त्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक १३ जुलै २०२१ ला सायंकाळी ७:३० ते ०८:०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी/पीड़ित वय २४ वर्ष युवती हि काही कामानिमित्य तिच्या घरुन विवेकानंद नगर येथे जात असतांना आरोपी नामे – शुभम कृष्ण वंजारी वय २५ वर्ष राहणार पटेल नगर कन्हान हा मागुन येवुन फिर्यादी हिला बोलायचे आहे असे म्हणून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला .
सदर प्रकरणी फिर्यादी पीडितेच्या रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी ला अटक करुन त्यांचा विरुद्ध कलम ३५४ भांदवि कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करीत आहे .