*कोळश्याची अफरातफरी करणाऱ्या ट्रक चालकास कन्हान पोलीसांनी पकडले , मालकांचा शोध सुरू*
*कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत अण्णा मोड एन एच ४४ हायवे रोड डुमरी शिवारात टिप्पर ट्रक चालक व मालक या दोघांनी संगमत करून निम्न दर्जाचा कोळसा भरून ७५ हजार रूपयाच्या कोळश्याची अफरातफर केल्याने कन्हान पोलीसांनी ट्रक चालकास पकडुन दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रक मालकांचा चा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार दिनांक.१७ जुलै २०२१ ला सायंकाळी ५:३० ते रात्री १० वाजता च्या दरम्यान टिप्पर ट्रक क्रमांक. एम एच ४० बीएल ३४१९ चा मालक याने खदान नंबर ६ इंदर काॅलरी येथुन ३१,८०० टन कोळसा किंमत ७५,००० रुपयाचा माल आपल्या टिप्पर ट्रक मध्ये भरून महामिनिरल्स माइनिंग अँन्ड बेनीफी सीएशन प्राइवेट लिमिटेड कोल वाॅशरी (गुप्ता कोल वाॅशरी) येसंबा येथे कोळसा खाली करण्याकरिता निघाला असता खदान नंबर ६ ते यसंबा हे अंतर अंदाजे ६ किलो मीटर असुन कोळसा भरलेला टिप्पर महामिनिरल्स माइनिंग अँन्ड बेनीफीसीएशन प्राइवेट लिमिटेड कोल वाॅशरी (गुप्ता कोल वाॅशरी) येसंबा येथे खाली न करता इतर ठिकाणी कोळसा खाली करून त्या ऐवजी निम्न दर्जाचा कोळसा भरून ७५,००० रुपये किंमतीच्या कोळश्याची अफरातफरी करून रात्री १० वाजता अण्णा मोड डुमरी येथे टिप्पर ट्रक सोडुन पळुन गेले. असे १) सुरेंन्द्र सिताराम पाटील वय ४५ वर्ष राह. कांन्द्री, धंदा सुपरवाइझर लोढा ट्रान्सपोर्ट व २) आनंद रमेश गुप्ता राह. सावनेर धंदा लिगल कन्सलटंट यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथे माहीती दिल्याने कन्हान पोलीसांनी कोळसाच्या प्ररिक्षण अहवाल प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते यांनी चौकशी अहवाल तयार करून टिप्पर क्र. एमएच बी एल ३४१९ चा चालक रवि धुर्वे व मालक राहुल बातुलवार यांनी संगमत करून निम्न दर्जाचा कोळसा भरून ७५ हजार रुपयाच्या मालाची अफरातफर केल्याने सरकार तर्फे फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते यांच्या तक्रारी वरून टिप्पर ट्रक चालक रवीकरण काशीराम धुर्वे वय २६ वर्ष राहणार. खदान नंबर ६ कन्हान यास अटक करून त्यांचे विरुद्ध अपराध क्रमांक २२१/२०२१ कलम ४०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून टिप्पर ट्रक मालक चा शोध सुरु केला आहे.
सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते, सफौ येशु जोसेफ, राहुल रंगारी, संजु भदोरिया हे पुढील तपास करीत आहे.