Breaking News

*नरखेड तालुका पतंजलि योग समन्वय समिती कडून जडीबुडी लागवड व वाटप* *कोरोना योद्धा चा सत्कार औषधी वनस्पती देउन* *खैरगाव आरोग्य उप केन्द्र व ग्रामपंचायत मध्ये केली औषधी वनस्पती लागवड* *देशातील सरकारी आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक औषधी मिळावी रुग्णांना अशी गावकरी जनतेची मागणी*

*नरखेड तालुका पतंजलि योग समन्वय समिती कडून जडीबुडी लागवड व वाटप*

*कोरोना योद्धा चा सत्कार औषधी वनस्पती देउन*

*खैरगाव आरोग्य उप केन्द्र व ग्रामपंचायत मध्ये केली औषधी वनस्पती लागवड*

*देशातील सरकारी आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक औषधी मिळावी रुग्णांना अशी गावकरी जनतेची मागणी*

नरखेड प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे

नरखेड – पतंजलि योग समन्वय समिती यांच्या सहकार्य मधून सध्याच्या कोरोना परिस्थितीत च्या सामान्य लोकांना निरोगी जिवन कशा प्रकारच्या आयुवेदीक वनस्पती ने फायदा कसा होईल यासाठी नेहमीच प्रयत्न शिल असते.याचे महत्त्वाचे काम करत आहे. मग ते योग आसने असो की आयुर्वेदिक आपल्या घरी लावणेस योग्य बहुगुणी वनस्पती असो यांच्या फायदा सर्व सामान्य लोकांना कशा प्रकारे कमी खर्चत कमी वेळेत मिळणेस प्रसार प्रचार करत आसते.यांच्या उद्देशला डोळे समोर ठेऊन खैरगाव या गावातील प्राथमिक उप आरोग्य केन्द्र येथे कार्यक्रम झाला . डॉ संजय ब्राह्मडे आरोग्य अधिकारी , चरपे औषधी विभाग प्रमुख , आरोग्य सेवीका बेबी बाई पाटील या सर्वानी कोरोना च्या आतिशय कठीण वेळेत स्वतः च्या जिव हा मुठीत ठेऊन समाज ची सेवा केली .अशा प्रकारचे कार्य करणेस त्यांना नेहमी प्रेरणा मिळावीत यासाठी त्याचा सत्कार हा बहुगुणी अनेक आजार वर फायदेशीर असणारी गिलोई वेल,आवळा ,कोरफड, तुळस अशा प्रकारे चे अनेक औषधीक वनस्पती भेट देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आरोग्य केन्द्र परीसरात आवळेच्या झाडाची लागवड करण्यात आली. डॉ संजय ब्राह्मडे यांनी आयुवेदाचे महत्त्व हे सामान्य लोकांना अतिशय फायदेचे आहेत पटवून दिले ,खैरगाव ग्रामपंचायत कार्यलया मधील ग्राम आधिकारी संजय भक्ते यांनचा सत्कार हा चिंचेचे झाड देऊन करणेत आला.व उपस्थित पदाधिकारी राहुल वानखेडे ग्रामपंचायत सदस्य यांना गिलोई ,तुळस ,कोरफड च्या वाटप केला .नंतर चिंच च्या झाडाची लागवड ही परीसरात करण्यात आली, कडूनिंब च्या झाडाजवळ गिलोई लागवड केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर काळे शिक्षक यांनी केले त त्यांनी योगाचे व औषधी वनस्पती फायदे हे अनेक छोट्या मोठ्या आजार साठी उपयुक्त आहे . हे समजावून सांगितले.

पंतजलि नरखेड योग समन्वयक समिती अध्यक्ष
पुरूषोत्तम थोटे यांनी आपलेला आयुर्वेदिक औषधी ही सरकारी प्राथमिक आरोग्य केन्द्र मध्ये मिळाला पाहिजे यासाठी शासनाने दखल घेवीत यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्र मधून व ग्रामपंचायत मधून एक ठराव हा राज्य सरकार कडे पाठवा असे सांगितले पतंजली चे किसान सेवा प्रभारी सुरेश पांढरकर
यानी म्हटले की आयुर्वेदिक औषधी च्या वापर जास्त प्रमाणात करणे ही काळाची गरज आहे.
डॉ संजय ब्राह्मडे यांनी आयुवेदाचे महत्त्व हे सामान्य लोकांना अतिशय फायदेचे व कोरोना मुळे ज्यानी रासायनिक औषधाच्या अतिप्रमाणात वापर केला व त्याची रोगप्रतिकारक शकती कमजोर झाली अशानी आयुवेदीक वनस्पती च्या उपयोग करुन स्वतः ला निरोगी ठेवू शकता असे संबंधित केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीकांत मालधुरे पतंजली योग शिक्षक ,नरखेड तालुका पंतजिल मिडिया प्रमुख यांनी उपस्थित पदाधिकारी याचे आभार मानले कार्यक्रम ला यशस्वी करणेसाठी तेजश्री बनाईत, ,अकाश गाखरे पतंजलि योग शिक्षक, गौरी बनाईत, दिनेश कोरडे अंकुश बनाईत यांनी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …