*प्रहार पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण सुटले*
*तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना शासना कडुन मिळणार लाभ – तहसीलदार अरविंद हिंगे*
कामठी प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी :- एन एम आर डी (NMRDA) अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना केंन्द्र सरकारचा अडकलेला निधी तात्काळ उपलब्ध करून
घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याचा मागणी करीता प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वडोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विधानसभा प्रमुख छत्रपाल करडभाजने ,उप तालुका प्रमुख श्रीकांत ठाकरे , वाहण चालक संघटना तालुका प्रमुख सोनु कानफाडे यांनी आमरण उपोषण सुरु केले असता मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ ला कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे व मौदा तालुकाचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली असता प्रहार पदाधिकाऱ्यांना समजुत काढुन तसेच एनएमआरडीए च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सवांद साधुन झालेल्या संवादातुन तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना शासना कडुन लाभ मिळणार असे स्पष्ट झाल्याने तहसीलदार अरविंद हिंगे व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी उपोषण कर्त्यांना
निंबु शरबत पाजुन त्यांचे आमरण उपोषण सोडवले .
या प्रसंगी प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हा पदाधिकारी रमेश कारेमोरे , तालुका प्रमुख पंकज ढोरे , सोशल मीडिया प्रमुख कार्तिक भिसेकर , नान्हा मांगली येथील माजी सरपंच सुधाकर करडभाजने , वृषभ अटारकर , शुभम धावळे , रमेश पारधी , किरण महाकाळकर , गणेश करडभाजने , दिलीप चौधरी , सह आदि नागरिक उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज