Breaking News

*कुख्यात मिलिंद धापोडकर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द* *नागपुर जिल्हा ग्रामीण मधिल पहिले प्रकरण*

*कुख्यात मिलिंद धापोडकर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द*

*नागपुर जिल्हा ग्रामीण मधिल पहिले प्रकरण*

सावनेर – येथील हातभट्टी दारू गाळणारा कुख्यात गुन्हेगार मिलींद धापोडकर हा MPDA कायदयान्वये नागपूर कारागृहात स्थानबध्द पोलीस स्टेशन सावनेर नागपूर ग्रामीण हद्दीतील हातभट्टी दारू काढणारा व अवैध गावठी दारू विकी करणारा इसम मिलींद हेमराज धापोडकर वय 36 वर्षे रा . बाजारचौक पाटनसावंगी यास मा . जिल्हादंडाधिकारी नागपूर यांचे आदेशाने MPDA कादयान्वये मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे 01 वर्षे कालावधी साठी दिनांक 22.07.2021 रोजी स्थानबध्द केले आहे .*

*स्थानबध्द नामे मिलीद हेमराज धापोडकर रा . पाटनसावंगी हा मागील 6 ते 7 वर्षा पासुन हातभट्टी लावून मोहाफुलाची गावठी दारू गाळुन गावात व आजुबाजुच्या परिसरात दारूची विक्री करत होता . तो एक सराईत हातभट्टीवाला असुन सन 2018 पासुन सतत हातभट्टी लावुन गावठी दारू निर्मीती व विक्री करीत होता*


*सावनेर पोलीसांनी त्याच्या अवैध अड्डयावर वारंवार रेड करून कायदेशीर कार्यवाही केली व गुन्हे दाखल केले आहे . तसेच वेळोवेळी त्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही केली तरी सुध्दा त्यांचेमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही . त्यामुळे त्याच्यावर MPDA कायदयांतर्गत कार्यवाही करण्याबाबत ठाणेदार सावनेर यांनी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचेमार्फत जिल्हाधिकारी नागपूर यांना प्रस्ताव सादर केला . मिलींद धापोडकर हा त्याच्या साथीदारासह वाहनाव्दारे दारूची वाहतुक करतो . तसेच वाहने वेगाने व निष्काळजीपणे चालवतो त्यामुळे रस्त्याने येणारे व जाणारे , परिसरातील आणि इतर लोकांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला होता . सदर व्यक्तीचे या वर्तणामुळे त्यास अवैद्य पैसा मिळविण्याचे साधन निर्माण झाले असे वाटत असल्याने तो पाटनसावंगी गावामध्ये नियमित अवैद्यरित्या दारूची विकी करीत होता . त्यामुळे ग्राम पाटनसावंगी ला लागून असलेल्या परिसरातील 4 ते 5 गावातील तरूण मुले , व्यक्ती दारूच्या आहारी जावुन व्यसनाधीन झालेले आहेत . तसेच व्यसनी व्यक्तीमुळे तरूण पिढीचे कुटुंबे व्यसनाधीन होवुन कुटुंबातील मुली , स्त्रियांना त्रास सहन करावा लागत आहे . व्यसनी ईसमांमुळे नागपूर ग्रामीण परिसरातील ता . सावनेर ग्राम पाटनसांवगी व परिसरातील स्त्रिया , मुलीचे छेडखानीचे प्रमाण वाढले असल्याने सार्वजनिक व्यवस्थेत बाधा उत्पन्न झाली आहे . सदरची परिस्थीती लक्षात घेता नागपूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री . राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली मिलींद धापोडकर यांचे विरूध्द MPDA कायदयांतर्गत कार्यवाही करून मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानबध्द केले आहे*

*सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री . राकेश ओला , अपर पोलीस अधीक्षक श्री . राहुल माकणिकर , श्री . अशोक सरंभळकर उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . अनिल जिट्टावार , पोलीस निरीक्षक मारूती मुळूक ठाणेदार सावनेर , सहा . पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर , सहा . पोलीस निरीक्षक , राजीव कर्मलवार , जितेंद्र वैरागडे , पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे , सहा . फौजदार बाबा केचे , पोलीस हवालदार चंद्रशेखर घडेकर , निलेश बर्वे , विजय डोंगरे , नायक पोलीस दिनेश आधापुरे , राजेंद्र रेवतकर , महिला नायक पोलीस नम्रता बघेल , रोशनी भोयर , पोलीस शिपाई भुपेश तभाने आणि चालक नायक पोलीस अमोल कुथे यांनी पार पाडली*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …