*2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास*
*बँकेच्या परिसरात सुरळीत पार्कींग व्यवस्था नसने व प्रवेशद्वारावरील गर्दीमुळे घटतात अश्या घटना*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर- सावनेरच्या मध्यभागी गजबजलेली असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया समोर दोन तरुण इसमाचे 2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना सावनेर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश छत्रपाल रहाटे व रजत रामराव रहाटे दोन्ही रां मंगसा,हे दोघेही सावनेर नजीक असलेल्या मंगासा गावातून 2 लाख 70 हजार रुपये घेऊन स्थानिक स्टेट बँक सावनेर येथे दुपारी दोन वाजताच्या दरम्यान आले असता पैशाने भरलेली बॅग मोपेड दुचाकीच्या हांडेललाच होती. गाडीतून उतरताच कोणीतरी अंगावर काहितरी टाकल्याचे लक्षात आले व हात व मानेला खाजवायला सुरुवात केली असतात चोरट्यांनी पैशाने भरलेली पिशवी लंपास केली.*
*रुपेश व रजत यांना लक्षात येण्या अगोदरच चोरटा पळून गेला त्याचा शोधाशोध करून सुद्धा तो वृत्त लिहीपर्यंत पोलिसांना मिळाला नाही परंतु काही मुख्य मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज बघितले असता दुकाना समोरून हातात लाल कलरची पिशवी घेऊन पळत असल्याचे निदर्शनात आले यावरून चोरटा हा बसस्थानकाच्या दिशेने निघाला असे लक्षात येताच पोलीस निरीक्षक यांनी संपूर्ण पोलीस ताफा चोरट्याला शोधण्यास लावला. पो.नि.मारूती मूळूक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिपक करांडे , पोलीस शिपाई प्रकाश खोके, निलेश तायडे, दिनेश घाडगे सह गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी पुढिल तपास करीत आहेत.*

*बँक परिसरात सुरक्षा कँमेरे व पार्किंगचा आभाव*
*शहरातील स्टेट बँक,बँक आँफ इंडिया सह अन्य बँकेच्या परिसरात बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने बँकापुढे दुचाकी चारचाकी वाहनांची गर्दी सोबतच बँकेच्या आतल्या भागातही खातेदारांकरीता असलेला कमी परिसर सोबतच कोवीड़ 19 च्या दिशानिर्देशामुळे मोजक्या लोकांना आत प्रवेश मीळत असल्याने प्रवेशव्दारावर नेहमीच गर्दी असते.यावर बँक व्यवस्थापनास पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाकडून अनेक स्मरणपत्र देऊणही स्थीतीत सुधारणा होत नसल्याची खंत आहे.सदर घडलेल्या प्रकारावर स्टँट बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधन्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही तर सदर लुटपाटीची घटना आमच्या बँक परिसराच्या बाहेरील असल्याने त्याच्याशी बँक व्यवस्थापणाचा काहीही संबध नाही असे मत व्यवस्थापकांचे असल्याचे सुत्र आहे*
Maharashtra News Media सच की आवाज