Breaking News

*अवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्याऱ्या युवकास कन्हान पोलीसांनी पकडले* *कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*

*अवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्याऱ्या युवकास कन्हान पोलीसांनी पकडले*

*कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत शिवमंदीर जवळ फुकट नगर कांन्द्री येथे कन्हान पोलीस पेट्रोलिंग करित असतांना एक इसम अवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण परिसरात दशहत पसरवितांना आढळुन आल्याने कन्हान पोलीसांनी अखिलेश सोमकुवर यास ताब्यात घेऊन त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.२१ जुलै २०२१ चे ४:०० ते ४:३० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरा द्वारे माहिती मिळाली की वाघधरे वाडी कन्हान येथील राहणारा इसम अखिलेश मुनेश्वर सोमकुवर वय २२ वर्ष राहणार. वाघधरे वाडी तारसा रोड कन्हान हा आपल्या जवळ हत्तीमार चाकु बाळगुण परिसरात दशहत पसरवत असल्याची गुप्त माहिती कन्हान पोलीसांना मिळाल्याने त्याची शाहनिशा करून कायदेशीर कारवाई करण्याकरिता कन्हान पोलीस परिसरातील दोन प्रतिष्ठीत नागरिकांना लेखी सुचनापत्र देवुन पंच बोलवुन त्यांचे सह वाघधरे वाडी येथे गेले असता एक इसम गुलाबी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व पोपटी रंगाचा जिन्स वापरलेला दिसल्यास त्यास थांबवुन पंचासमक्ष त्यांची अंग झडती घेतली असता अखिलेश सोमकुवर च्या जिन्स पॅन्ट मधुन कंबरेला एक हत्तीमार चाकु किंमत १०० रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करून त्यास ताब्यात घेतले. सदर इसमाने मा.श्री जिल्हाधिकारी साहेब नागपुर जिल्हा नागपुर यांनी निर्गमित केलेल्या आंदेशांचे उल्लंघन केल्याने त्याला मुद्देमाला सह पोलीस स्टेशन ला आणुन सरकार तर्फे फिर्यादी पोलीस शिपाई विशाल शंभरकर यांच्या तक्रारी वरून अखिलेश मुनेश्वर सोमकुवर विरुद्ध अपराध क्रमांक.२७२/२०२१ कलम ४/२५ भा.ह कायदा सह कलम १३५ मवोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन ही कारवाई नागपुर ग्रामीण पोली स अधिक्षक श्री राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्री राहुल माखणीकर, पोलीस उपअधिक्षक विभाग कामठी श्री मुख्तार बागवान, यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी, सपोनि सतिश मेश्राम, नापोशि राहुल रंगारी, पोशि संजय भदोरिया, मुकेश वाघाडे, विशाल शंभरकर सह कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्विते रित्या पार पाडली.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …