*बोर्डा येथे अज्ञात आरोपींनी दोन बैटरी केल्या चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध केला गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोर्डा गणेशी शिवारात अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांच्या ट्रैक्टर मधल्या दोन बैटरी चोरी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक १९ जुलै २०२१ चे सायंकाळी ०६:०० ते मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ चे सकाळी ०७:०० वाजता च्या सुमारास फिर्यादी नामे मुन्नालाल परसराम अमृते वय ५३ वर्ष राहणार हनुमान नगर कन्हान यांनी त्यांचे ट्रैक्टर घरासमोर लावुन रात्री घरातील सर्व मंडळी झोपुन गेले असता सकाळी फिर्यादी मुन्नालाल परसराम अमृते यांचा मुलगा हा ट्रैक्टर क्याचविल लावत असतांना ट्रैक्टर मध्ये बॅटरी दिसुन आली नाही . गावात बातमी पसरताच श्री बेलीराम तेजराम डुडरे यांनी सुद्धा त्यांचे ट्रैक्टर मध्ये बॅटरीची पाहणी केली असता त्यांना सुद्धा बॅटरी दिसुन आली नाही अशा दोन बॅटरी एकुण किंमत ८,००० रुपए चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेले . सदर प्रकरणी फिर्यादी मुन्नालाल परसराम अमृते यांचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करीत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज