*मुख्यमंत्र्याचे कार्य जनसामान्यापर्यंत पोचण्यासाठी व पक्ष वाढवण्यासाठी भद्रावती मधे शिवसेनेची शिव संपर्क मोहीम*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेसाठी केलेले उल्लेखनीय कार्य जनसामान्यापर्यंत पोहोचावे यासाठी नामदार उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात जिल्ह्या जिल्ह्यातून शिवसेनेतर्फे पक्षवाढीसाठी शिव संपर्क मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली असून शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर रमेशभाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वात सदर मोहीम भद्रावती शहरातील सूर्य मंदिर व गजानन मंदिर येथे राबवण्यात आले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मते उपजिल्हाप्रमुख रमेशभाऊ मेश्राम, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ डुकरे, शहर प्रमुख शिवसेना भद्रावती तथा नगरसेवक नंदूभाऊ पडाल, नगरसेवक राजूभाऊ सारंगधर, युवासेना तालुका प्रमुख भद्रावती समन्वयक घनश्याम भाऊ आस्वले, शिवसैनिक कल्पनाताई भुसारी, शिवसैनिक शिव गूडमल, शिवसैनिक विद्या किंनके, गजानन महाराज मंदिरचे सचिव रमेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते यांनी त्यांच्या भाषणातून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यणीत केलेल्या विविध योजनेची माहिती उपस्थितीना दिली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर रमेशभाऊ मेश्राम यांनीसुद्धा एक वचनी असलेले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे ओनित्य साधून सदर प्रभागात आरोग्य पत्ता नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले यावेळी 160 नागरिकांची तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. यावेळेस शिवसेनेचे सदस्य मोहीम राबवण्यात आली यावेळी तरुण शिवसैनिक आणि शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले. या सर्व कार्याची जबाबदारी वैभव रमेश मेश्राम, त्रिवेणी कवडूजी मेश्राम महिला पदाधिकारणी यशस्वरित्या सांभाळली.
Maharashtra News Media सच की आवाज