*रनाळयतील हवेली बार ची राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली पाहणी*
*हवेली बार विरोधात संतप्त महिलांचे संबंधित अधिकार्यांना निवेदन*
कन्हान / कामठी प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी – तालुक्यातील राजकीय पदाधिकारी व उच्च शिक्षित वस्ती म्हणून ओळख असलेल्या रनाळा गावातील सर्वे क्रमांक २८/०३ प्लॉट क्रमांक ४ वर काही महिण्यापूर्वी हवेली बार अँड रेस्टरेंट व लोजिंगला उघडण्यास परवानगी देण्यात आली होती यानुसार या लॉजिग मध्ये काही अल्पवयीन मुलीकडून होत असलेल्या अश्लील कामामुळे परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून सदर हवेली बार अँड रेस्टरेंट व लॉजिग ची परवानगी रद्द करण्यात आली होती. उल्लेखनीय आहे की या बारच्या मालकाचे असलेले कामठी बस स्टँड चौकातील सुनील बार व लॉजिग वर पोलिसानी घातलेल्या धाडीतून पिटा कायद्यांतर्गत कारवाही सुद्धा करण्यात आली आहे. मात्र आता पुनश्च महाविर नगर येथील सदर जागेवर हवेली बार अँड रेस्टरेंट ला परवानगी देण्यात आली आहे.ज्यामुळे भरल्या लोकवस्तीत असलेल्या या हवेली बिअर बार मुळे परिसरात तणावाचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा केव्हाही निर्माण होऊ शकतो तेव्हा महावीर नगर च्या नागरिकांच्या जनभावणेची जाणीव घेऊन सदर हवेली बार अँड रेस्टरेंट ला दिलेली परवानगी रद्द करून सुरू असलेले बिअर बार बंद करण्यात यावे या मागणीसाठी परिसरातील संतप्त महिलांनी शेकडो महिलांसह रनाळा ग्रामपंचायत प्रशासनाला सामूहिक निवेदन देऊन सदर बिअर बार ला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती या विषयाची रितसर तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय राज्य उत्पादन विभाग व कामठी पोलीस विभागांना निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने सोमवार १९ जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागा च्या अधिकाऱ्यांनी सदर. बियर बार परिसराची मोका चौकशी पाहणी केली त्याप्रसंगी उपस्थित स्थानीय महिलांनी बार लगतच महिला समुपदेशन केंन्द्र बाल उद्यान व वयोवृद्ध नागरिकांसाठी फिरण्यासाठी असलेल्या गार्डन लगतच सार्वजनिक मैदानात ग्रीन जिम आहे त्यात अनेक महिला फिरायला व्यायामाला योगाला जात असतात प्रसंगी बारमधून दारू पिऊन येणारे घाणेरड्या शिव्या व आमच्या घरासमोर उघड्यावर लघुशंका करतात त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून दिले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्या महिलांच्या सह्यांचे नमुने घेत परिसरातील मौका पाहणी केली . या प्रसंगी लिना बंजारी , रमा गजभिये , सारिका चंद्रिकापुरे , सुशीला खोब्रागडे , योगिता बागडे , कंचन पटेल , मीना वैद्य , संगीता जयस्वाल , अनिता गजभिये , संगीता भिवगडे , रागिनी पिल्ले , छाया खोपे , सारिका कांबळी , कल्पना गायधने , सुरेखा चिंचखेडे , सविता मस्के , प्रियंका तालेवार , अरविंदा शिंदे , शालिनी वासनिक , छाया शहाणे , संध्या विश्वकर्मा , वंदना दोडके , ललिता इंगळे , कुसुम वाहने , सविता शिंदे , शकुंतला कोसळकर , सोनू ढवळे , वैशाली आरेकर , प्रिया मेश्राम , पूजा करणार , सहित आदि महिलांनी हवेली बार बंद करण्याची मागणी केली आहे .
Maharashtra News Media सच की आवाज