Breaking News

*धाब्यावर उभ्या १४ चाकी मालवाहक ट्रकचा टायर आरोपीने चोरून नेला* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

*धाब्यावर उभ्या १४ चाकी मालवाहक ट्रकचा टायर आरोपीने चोरून नेला*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ५ कि.मी अंतरावरील नागपुर जबलपुर महामार्गावरील अण्णामोड डुमरी येथील धाब्यावर जेवण करण्यास जातांना १४ चाकी ट्रक उभा करून गेले असता अज्ञात आरोपीने उभ्या ट्रकचा टायर चोरून बोलोरो चारचाकी वाहनात टाकुन नागपुर कडे घेवुन पळुन गेल्याने फिर्यांदी ट्रक चालका च्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक.२६ जुलै २०२१ चे ११:३० ते १२:३० वाजता दरम्यान कुमरलाल गौरी प्रसाद यादव वय ४० वर्ष राहणार. अगरीया थाना मजगमा जिल्हा जबलपुर मध्यप्रदेश चा चालक व त्यांचा क्लीनर हा त्यांच्या ताब्यातील १४ चाकी मालवाहक ट्रक क्रमांक. एम एच ४० एके ४७५७ मध्ये जबलपुर वरून सिंमेट खाली करून येतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील अण्णामोड डुमरी च्या धाब्यावर कुमरलाल गौरीप्रसाद यादव चालक व त्याचा क्लीनअर हे जेवन करण्याकरिता गेले असता ते जेवन करून परत आले तेव्हा १४ चाकी ट्रकच्या डाव्या बाजुचा लिफटर टायर अपोलो १०० केएल किमत ८००० रुपयांचा टायर ट्रकला लागुन दिसला नाही तेव्हा चालक व क्लीनरने ट्रकच्या मागे उभ्या पांढऱ्या रंगाची बोलोरो चारचाकी वाहन क्रमांक एम पी- १९ -सीसी – ४९१७ ही उभी दिसली व त्यात गाडी च्या मागच्या भागात ट्रक च्या टायर दिसला. चालक व क्लीनर गाडी जवळ येतांना पाहुन बोलोरो चारचाकी वाहनाचा चालक आरोपीने त्याचे ताब्यातील वाहन नागपुर कडे घेवुन पळुन गेला. फिर्यादी कुमरलाल यादव ने त्याचा पाठलाग केला पण आरोपी मिळुन आला नसल्याने सदर प्रकरणी फिर्यादी चालक यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी विरुद्ध कल म ३७९ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन सदर आरोपीचा शोध घेणे सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार जयलाल सहारे हे करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …