Breaking News

*कन्हान गहुहिवरा रोड येथील रिलॅक्स ढाब्या च्या मॅनेजर ला चाकुने माराहण करुन केले जख्मी* *फिर्यादी जख्मी मॅनेजर च्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*कन्हान गहुहिवरा रोड येथील रिलॅक्स ढाब्या च्या मॅनेजर ला चाकुने माराहण करुन केले जख्मी*

*फिर्यादी जख्मी मॅनेजर च्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत रिलॅक्स ढाबा गहुहिवरा रोड येथे जेवन करायला गेलेल्या आरोपी चिकु ठाकुर यांनी ढाबाच्या मॅनेजर योगेश बोरकर सोबत भांडण व धक्काबुकी करुन व चाकुने माराहण करुन जख्मी केल्याने योगेश बोरकर ला कामठी येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन कन्हान पोलीसांनी जख्मी फिर्यादी च्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हकीकत अशा प्रकारे आहे कि जख्मी युवक योगेश उर्फ सोनु आंनदराव बोरकर वय ३८ वर्ष राहणार पिपरी प्रभाग क्रमांक ६ येथे पत्नी व दोन मुलासह राहत असुन हा गहुहिवरा रोडवर असलेल्या रिलॅक्स ढाबा येथे मॅनेजर म्हणुन काम करतो. शनिवार दिनांक.३१ जुलै २०२१ ला सायंकाळी ५:३० वाजता च्या सुमारास फिर्यादी युवक योगेश उर्फ सोनु आंनदराव बोरकर हा रिलॅक्स ढाब्यावर कामावर आला. त्यानंतर अंदाजे रात्री ८ वाजता दरम्यान आरोपी अंबरसिंग उर्फ चिकु गुड्डू ठाकुर वय २३ वर्ष राहणार शिवनगर कन्हान हा आपल्या दोन मित्रासोबत आला व त्यांनी जेवन करून तिघेही क्वाॅंन्टर जवळ आले व धाब्यावर काम करणारा आणि क्वाॅंन्टर वर बसणारा आशु हा तेथे होता तर योगेश बोरकर याने आशु यास म्हटले कि ” याच काय आहे ” तर आशु म्हणाला कि भाऊ बिल घ्यायचे आहे. तर योगेश बोरकर याने त्यांना म्हटले कि तुम बिल दे दो तर अंबरसिंग ठाकुर याने योगेश बोरकर सोबत काही ही न बोलता धक्का बुक्की केली व एकाएक आपल्या जवळील चाकु काढुन योगेश बोरकर याच्या छातीच्या खालील भागात डाव्या बाजुस बरगडीवर माराहण करुन जख्मी केले. तेव्हा त्याच्या सोबत असलेले दोन्ही मित्र बाहेर पडुन गेले आणि आरोपी अंबरसिग गुड्डू ठाकुर याने जाते वेळी जख्मी युवक योगेश बोरकर याला म्हटले कि तेरे को देख लुंगा असे म्हणुन ढाब्याचा बाहेर निघुन गेला. त्यानंतर जख्मी योगेश बोरकर ला कामठी येथील खाजगी दवाखान्यात उशीरा रात्री उपचारार्थ दाखल करून उपचार सुरू आहे. कन्हान पोलीसांनी फिर्यादी योगेश बोरकर च्या तक्रारीवरून आरोपी अंबरसिंग ऊर्फ चिकु गुड्डु ठाकुर विरुद्ध कलम ३२६, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस करत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …