Breaking News

*कांन्द्री ला एका युवकास चाकु सारख्या शस्त्रा ने माराहन करुन गंभीर जख्मी केले* *स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने मनसर येथुन दोन आरोपी पकडले*

*कांन्द्री ला एका युवकास चाकु सारख्या शस्त्रा ने माराहन करुन गंभीर जख्मी केले*

*स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने मनसर येथुन दोन आरोपी पकडले*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जुन्या एम.एस. सी.बी कार्यालय जवळ कांन्द्री येथे फिर्यादी व आरोपी हे मित्र असुन यांचे शुल्क कारणावरून भांडण झाल्याने आरोपी ने फिर्यादी आकाश भोंडेकर च्या छातीवर, कंबरेवर व हातावर चाकुने मारहाण करुन गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी च्या तोंड़ी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी आरोपी इरफान खान विरुद्ध गुन्हा दाखल केले असुन स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने मनसर येथुन दोन आरोपी ला पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला
ताब्यात दिले असुन सदर घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीसांनी सुरू केला आहे.


हकीकत अशा प्रकारे आहे की आकाश धनिराम भोंडेकर वय २५ वर्ष राहणार. हरिहर नगर वार्ड नंबर.१ कांन्द्री कन्हान व इरफान उर्फ चोरवा मकबुल खान वय १९ वर्ष राहणार. हरिहर नगर वार्ड नंबर १ कांन्द्री हे मित्र असुन एकाच वस्तीत राहत असुन शनिवार दिनांक.३१ जुलै २०२१ ला सायंकाळी आकाश भोंडेकर आपल्या दुचाकी वाहना ने घरी जात असतांना इरफान उर्फ चोरवा मकबुल खान याने आपली सायकल आकाश भोंडेकर च्या दुचाकी समोर आणली त्यावरून आकाश भोंडेकर व इरफान खान या दोघांन मध्ये तोंडा-तोंडी वाद झाला. त्या दरम्यान इरफान खान याने आकाश भोंडेकर ला दोन तीन झापड मारल्या व पाहुन घेण्याची धमकी दिली. त्यावर आकाश भोंडेकर याने इरफान खान याला म्हटले कि, तुझ्या सारखे खुप पाहीले, तेरी औकात नही है असे म्हणून आकाश भोंडेकर घरी निघुन गेला. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक.१ ऑगस्ट २०२१ ला सकाळी ९ ते ९:३० वाजता दरम्यान आकाश भोंडेकर हा चौकात उभा असता इरफान खान हा तेथे आला व आकाश भोंडेकर यास म्हणाला कि तु काल माझी औकात का काढलीस असे बोलुन मनात राग धरून आकाश भोंडेकर याचा जिव घेण्याच्या उद्देशाने त्याच्या छातीवर, डाव्या कंबरेवर, उजव्या हाताच्या दंडा वर चाकु सारख्या शस्त्राने माराहण करुन गंभीर जख्मी केले. अश्या फिर्यादी आकाश धनिराम भोंडेकर यांच्या तोंडी रिपोर्ट वरून व वैद्यकीय अहवालावरून आरोपी इरफान उर्फ चोरवा मुकबुल खान यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक. २९८ /२०२१ कलम ३०७, ५०७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर घटनेचा तपासात स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाचे सपोनि अनिल राऊत, साफौ लक्ष्मी प्रसाद दुबे, हेकॉ विनोद काळे, नापोशि शैलेश यादव, अरविंद भगत, पोशि प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, चालक साहेबराव बिहाडे कन्हान पोस्टे चे पीएसआय जावेद शेख यांनी दोन्ही आरोपी इरफान खान व अमन कैथवार ला मनसर येथुन अटक करून कन्हान पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले असुन सदर घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …