Breaking News

*कन्हान पोलीसांनी अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला* *तीन लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त*

*कन्हान पोलीसांनी अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला*

*तीन लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पांधन रोड हनुमान नगर कन्हान येथे कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना एक ट्रैक्टर अवैध रेती वाहतुक करित असतांना मिळुन आल्याने त्याचा जवळुन रेती, ट्रॅक्टर व ट्राली असा एकुण तीन लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक.२९ जुलै २०२१ ला सायंकाळी ६:३० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस पांधन रोड हनुमान नगर येथे पेट्रोलिंग करीत असतांना लाल रंगाचा ट्रैक्टर चालक संतोष केशव उईके वय २८ वर्ष राहणार. कुंभलकर ढाबा कन्हान हा ट्राली मध्ये अवैधरित्या रेती वाहतुक करतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी विचारपुस केली असता राॅयल्टी नसल्याने कन्हान पोलीसांना निष्पन झाल्याने कन्हान पोलीसांनी चालकाच्या ताब्यातुन एक ब्रास रेती किंमत ३००० रुपये, ट्रैक्टर ट्राली किंमत ३,००,००० रुपये असा एकुण ३,०३,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन सरकार तर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे यांच्या तक्रारीवरून मालक मुरलीधर बाबुराव येलुरे व चालक संतोष केशव उईके यांच्या विरुद्ध कलम ३७९, १०९ भांदवि नुसार गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे, शरद गिते, राजेंद्र गौतम, दिपक कश्यप सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचुन ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …