Breaking News

*सीएसआर निधीतुन लावलेल्या कचरा कुंडयाही होत आहे गायब* *कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष*

*सीएसआर निधीतुन लावलेल्या कचरा कुंडयाही होत आहे गायब*

*कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – आयडीबीआय बॅंकेच्या सीएसआर निधी तुन प्राप्त झालेल्या कचरा कुंडया नगरपरिषद कन्हान-पिपरी शहरात विविध ठिकाणी लावल्या होत्या परंतु काही ठिकाणी लावलेल्या कचरा कुंडी काही ठिकाणी कचऱ्या सारख्या पडलेल्या असुन नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षेने कचरा कुंडया गायप होत असल्याने नागरिकांन मध्ये उलट सुलट विविध प्रश्न निर्माण होत आहे.


मागील दोन महिन्यापुर्वी आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतुन कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालयात प्राप्त झालेल्या कचरा कुंडी कन्हान शहरात विविध ठिकाणी लावण्याचा लोकार्पण सोहळा कन्हान -पिपरी नगरपरिषद व्दारे नगरपरिषद सामोर नगराध्यक्षा सौ. करूणाताई आष्टणकर यांच्या हस्ते कचरा कुंडी लावुन शुभारंभ करून कन्हान शहरातील महामार्गावर आणि विविध ठिकाणी लावण्यात आल्या होत्या परंतु दोन महिन्याच्या आत हया कचरा कुंडया लावलेल्या ठिकाणी दिसत नसुन, कुठे एक कचरा कुंडी दिसत आहे तर कुठे कचऱ्या सारख्या पडुन गायप होत असुन नगरपरिषद प्रशासनाचे या कडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांन मध्ये उलट सुलट विविध प्रश्न निर्माण होत आहे. मागील भाजप सत्ता मध्ये सुध्दा अश्या प्रकारे शहरात विविध ठिकाणी कचरा कुंडया लावण्यात आल्या होत्या. परंतु तेव्हाही नगरपरिषद प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केल्याने हळुहळु सर्व कचरा कुंड्या गायप झाल्या होत्या. नगरपरिषद व्दारे खर्च केेलेल्या निधीचा कुणी जवाब विचारला नाही परंतु शहरातील नागरिकांच्या सेवेच्या दुष्टीने आयडीबीआय बँकेने सीएसआर निधीतुन लावण्यात आलेली कचरा कुंडया अश्याच गायब होईल तर बॅंकेचे प्रशासनही जवाब विचारतील नाही काय ? अशी चर्चा नागरिकांन मध्ये सुरु होत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …