Breaking News

*सीरीया मैदानात पाण्याची टाकी न लावण्याची मागणी* *भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदार व नप मुख्याधिकार्यांना निवेदन*

*सीरीया मैदानात पाण्याची टाकी न लावण्याची मागणी*

*भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदार व नप मुख्याधिकार्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी नगर परिषद अंतर्गत सीरीया मैदान हे एकमेव मैदान असुन येथे विविध कार्यक्रम आयोजित होत असल्याने सीरीया मैदानात पाण्याची टाकी न लावण्याची मागणी भाजपा पदाधिकार्यांनी शहर अध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात तहसीलदार व नप मुख्याधिकार्यांना एक निवेदन देऊन केली आहे .
कामठी शहरात सध्याचा परिस्थिति मध्ये सीरीया मैदान हे एकमेव मैदान असुन येथे विविध रंगारंग , सांस्कृतिक , सारखे विविध कार्यक्रम आयोजित होत असुन हे मैदान विकास आराखड्यात खेळाचे मैदान म्हणुन आरक्षित आहे . त्यामुळे या सीरीया मैदानात पाण्याची टाकी उभारण्यास नागरिकांचा विरोध होत असुन भाजप च्या शिष्ठमंडळाने शहर अध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार राजेश माळी व नप मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना एक निवेदन देऊन पाण्याची टाकी न लावण्याची मागणी केली आहे .


या प्रसंगी कार्याध्यक्ष लाला खंडेलवाल, महामंत्री उज्ज्वल रायबोले, राज हाड़ोती, सुनिल खानवानी, विनोद संगेवार,मंगेश यादव, राजा देशमुख, विरोधी पक्ष नेता लालसिंग यादव,गटनेता सुषमा सिलाम, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पंकज वर्मा,नगर सेवक प्रतीक पडोळे भाजयुमो जिला महामंत्री कपिल गायधने, जिला उपाध्यक्ष लालू यादव, गोपाल यादव, विजय कोंदुलवार, अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष वसी हैदरी,शेख असफाक, अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष विक्की बोम्बले, जिला पदाधिकारी पुष्पराज मेश्राम,झोपड़पट्टी आघाडी अध्यक्ष प्रमोद वर्णम, चंद्रकांत राऊत, प्रवीण आगाशे,राजा यादव,बरकत अली, यश कोंडे, मोंटू यादव, सतीश जैसवाल,अक्षय श्रावणकर, शुभम सिलाम सह आदि मोठ्या संख्येत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …