Breaking News

*विवेकानंद नगर येथे १० लोंखडी रॉड बंडल सह २५ हजार रूपयांचा. मुद्देमाल चोरी* *फिर्यादी च्या तोंड़ी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे*

*विवेकानंद नगर येथे १० लोंखडी रॉड बंडल सह २५ हजार रूपयांचा. मुद्देमाल चोरी*

*फिर्यादी च्या तोंड़ी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान येथील विवेकानंद नगर रहिवासी शालिक राम साखरकर यांच्या घराच्या बांधकामा करिता आणलेल्या ८ बंडल लोंखडी राड व बाजुच्या घरचे २ बंडल लोंखडी राॅड सह एकुण २५ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपी चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार विवेरानंद नगर प्रभाग क्रमांक ७ येथील रहिवासी श्री शालिकराम भोजराज साखरकर वय ५९ वर्ष यांनी आपल्या घर बांधकामाकरिता आणलेले १२ बंडल टीएमटी कंपनीचे लोंखडी राड विकत आणले असुन आपल्या घरा समोर ठेवले होते. सोमवार दिनांक.२ ऑगस्ट च्या रात्री ११ वाजता पासुन ते दिनांक. ३ ऑगस्ट च्या सकाळी ६ वाजता पुर्वी कुणी अज्ञात आरोपीने शालिकराम साखरकर यांचे टीएमटी कंपनी चे लोंखडी रॉडचे ८ बंडल किंमत २२ हजार रू.व बाजु ला राहणाऱ्या सरस्वतीबाई ठाकरे यांचे २ टीएमटी कंपनीचे लोंखडी रॉडचे बंडल किंमत ३ हजार रू. असे एकुण १० बंडल लोंखडी रॉड चे बंडल एकुण किमत २५ हजार रूपयाच्या मुद्देमालाची अज्ञात आरोपी चोरी केल्याने फिर्यादी शालिकराम साखरकर यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबार्ते यांनी अपराध क्रमांक ३०१ /२०२१ कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …