Breaking News

*जुन्या कारणावरून इसमाच्या डोक्यावर दगड मारून जख्मी केले* *जख्मी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

*जुन्या कारणावरून इसमाच्या डोक्यावर दगड मारून जख्मी केले*

*जख्मी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नंबर ६ येथे लवकुश सिंग याने जुना कारणावरून सुभाष यादव सोबत झगडा भांडण व शिवीगाळ करू न दगड डोक्यावर मारून जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक.२ ऑगस्ट २०२१ ला रात्री ९ वाजता दरम्यान सुभाष शामरूप यादव वय ४२ वर्ष राहणार. कोळसा खदान नंबर ६ हा आपले मित्रा सोबत पानीपुरी खाण्याकरिता खदान नंबर. ६ पाणी टाकी जवळ ठेला कडे आला असता तिथे लवकुश महेंन्द्र सिंग वय २० वर्ष राहणार कोळसा खदान नंबर ६ हा उभा होता. सुभाष यादव यांने लवकुश सिंग ला म्हटले कि तु मेरे बच्चो को बिना वजह गाली क्यो देता है, तेव्हा लवकुश सिंग ने जुना कारणावरून सुभाष यादव सोबत झगडा भांडण व शिवीगाळ करून दगड उचलुन डोक्यावर मारून जख्मी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. अश्या फिर्यादी सुभाष यादव च्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी लवकुश सिंग विरुद्ध अप क्रमांक ३००/२०२१ कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेत गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक सुनिल अंबर्ते हे करीत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …