*राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजुरा विधानसभा अध्यक्ष निलेश ताजने व न.प. गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे यांच्यासह असंख्य रा.कॉ. कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*

*निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार*
आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे
राजुरा विधानसभा अध्यक्ष निलेश ताजने व न.प. गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे भाजपा-शिवसेना-रिपाई (आ)-रासप महायुतीचे उमेदवार आ. संजय धोटे यांच्या प्रमुख उपस्थ्िातीत हा प्रवेश संपन्न झाला.
यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर, संजय धोटे यांनी निलेश ताजने, सौ. विजयालक्ष्मी डोहे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना भाजपाचे दुपट्टे घालुन पक्षप्रवेशाबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. नानाजी शामकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते अरूण मस्की, विनायक देशमुख, शिवाजी सेलोकर, महेश शर्मा, सतिश उपलेंचवार, राधेश्याम अडानिया, महादेव ऐकरे, संदीप शेरकी, आशिष ताजने, रामसेवक मोरे, सचिन डोहे, सचिन गुरनुले, प्रदिप पिंपळशेंडे, हरीश घोरे, कवडू जरीले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर, आ. संजय धोटे यांच्या नेतृत्वात राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरू असलेली अभूतपूर्व अशी विकासकामे व भाजपाची विकासाभिमुख कार्यशैली यामुळे आपण प्रभावित झालो असून त्यामुळेच आपण भाजपात प्रवेश घेतला आहे. या विधानसभा क्षेत्रात पुन्हा एकदा महायुतीचाच झेंडा फडकेल व संजय धोटे प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास निलेश ताजने यांनी व्यक्त केला तर संजय धोटे यांच्या विजयासाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू आणि यापुढे राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी परिश्रम घेवू असे सौ. विजयालक्ष्मी डोहे म्हणाल्या.

यावेळी श्रीमती शांता मोतेवाड महिला व बालकल्याण सभापती न.प. गडचांदूर, पंडीत काळे, अॅड. दिपांजली मानथावार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस, अरविंद डोहे रा.कॉ. तालुकाध्यक्ष कोरपना, अजीज बेग रा.कॉ. शहराध्यक्ष, भारत चन्ने, माजी सभापती कृउबास कोरपना, इम्रान बब्बु कुरैशी, संजय कोंडबत्तुनवार, दत्ता शेरे, पुरूषोत्तम ढोक, प्रतीक सदनपवार, सुनिल जोगी, अनिल मालेकर, अशोक झाडे, जैतापूरचे सरपंच ज्ञानेश्वर बैरड, शंकर गौरे, वसंत गानेवार, अशोक खुसपुरे, सुनिल खारकर, शोक झाडे, अनिल मालेकर, हर्षीत विश्वास, दीपक गुरनुले, अशोक दरेकर, धनराज विरूटकर, गजानन शेंडे, मेहबुब अली, मेहताब अली, अशोक मराठेवार, सुधाकर बोरीकर, विठ्ठल तुमराम, रामचंद्र ओस्कर, पुंडलिक टोंगे, संजय झगडे, सुभाष डाखरे, बाळू झाडे, मुन्नाभाई, नामदेव लेडांगे, दिनेश डोहे, पुंडलिक बोरकर, शंकर कोरवते, सुभाष आत्राम, अमोल पंधारे, प्रमोद घोटेकार, गणेश तुमराम, भाऊराव परचाके, राजपंगे, शंकर बोडेकर, अनिल ढवस, निलेश विधाते, गजानन येडे, दिलीप तुरकर, निलेश कुमरे, पदमाकर धगडी, अजीज भाई, नजीर भाई, शंकर चीतलवार, बंडू मोहितकर, सचिन डाखरे, रविंद्र गिर्सावले, मिन्नाथ टोंगे, अभय डोहे, प्रशांत घुंगरूड, देविदास झाडे, रवी झाडे, शरद मिस्त्री, अविनाश अत्राम, प्रफुल विठ्ठल काळे आदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतल्याने निवडणूकीच्या तोंडावर रा.कॉ. ला मोठे खिंडार पडले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज