*ओबीसी महासंघ स्थापना दिवस संपन्न*

नागपुरः राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे दिनांक 07/08/21शनिवार रोजी मंडल आयोग दिन तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सहाव्या स्थापना दिनाच्या निमित्त संताजी सांस्कृतिक सभागृह नागपूर येथे मोठ्या संख्येने ओबीसी बांधवाच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर तसेच प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्याचप्रमाणे पश्चिम नागपूर शहराचे माननीय आमदार विकास ठाकरे तसेच विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांची उपस्थिती विशेषत्वाने होती याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाने आयोजित केलेल्या व राष्ट्रीय युवा महासंघ यांच्या सौजन्याने संयुक्त कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या युवक, महिला, विद्यार्थी आणि कार्यकारिणीचे सदस्य यांच्या समक्ष या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.आपल्या प्रमुख भाषणात माननीय नानाभाऊ पटोले यांनी ओबीसी जनगणना झालीच पाहिजे,असा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र राज्याने देशामध्ये पहिल्यांदा केला असून त्याची अंमलबजावणी इतर राज्याच्या विधानसभेमध्ये झाली हा एक ओबीसींचा फार मोठा विजय आहे यानिमित्ताने या देशांमध्ये ओबीसी मध्ये अस्तित्व जागृत झाले असा दावा माननीय पटोले साहेबांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सहाव्या स्थापना दिनी ,स्थापना दिनाच्या शुभेच्छा दील्या माननीय अभिजीत वंजारी विधान परिषद सदस्य तसेच माननीय आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थित असलेल्या लोकांना मंडल दिनाच्या शुभेच्छा तसेच ओबीसी महासंघाच्या सहाव्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देऊन ओ बी सी चे प्रश्न आम्ही सभागृहांमध्ये मांडू असे आश्वासन दिले

याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघ च्या विविध पदाधिकाऱ्यांची समयोचित भाषणे पार पडली त्यामध्ये , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव शरदजी वानखेडे सुषमाताई भड राष्ट्रीय महिला अध्यक्ष एडवोकेट सौ रेखाताई बाराहाते कार्यकारिणी सदस्य राष्ट्रीय ओबीसी महासंघ कल्पनाताई मानकर महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा नयनाताई झाडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ विजयाताई धोटे विदर्भ महिला अध्यक्षा
राष्ट्रीय युवा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष घाटे राष्ट्रीय महासचिव राजकुमार घुले अध्यक्षीय भाषण डॉक्टर बबनरावजी तायवाडे सर यांनी आपल्या भाषणात संपूर्ण सभागृहाला मंडल आयोग व ओबीसी वर मार्गदर्शन केले. अशाप्रकारे नागपूर शहरांमध्ये आज मंडल आयोग दिन आणि ओबीसी स्थापना राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना दिन संपूर्ण भारतभरातील सर्व शहरांमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात संपन्न करण्यात आले या कार्यक्रमाला शहरातील विविध मान्यवर आणि नागपूर शहराचे विविध विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ वृंदाताई विकास ठाकरे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पूजाताई प्रमोद मानमोडे यांनी केले व आभार प्रदर्शन कालिंदी ताई नाहाते यांनी केले.

या कार्यक्रमाला आर्थिक सहयोग सुभाष श्रीराम घाटे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष राजकुमार घुले, राष्ट्रीय युवा महासचिव प्रवीण बावणकुळे, महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष विक्रम मानकर, युवा उपाध्यक्ष नागपूर शहर यांनी आर्थिक सहयोग केले.
Maharashtra News Media सच की आवाज