Breaking News

*कन्हान नदी काठावर संजीव महालोधी चा मुतदेह गळफास घेतलेला मिळाला* *कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला*

*कन्हान नदी काठावर संजीव महालोधी चा मुतदेह गळफास घेतलेला मिळाला*

 

*कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जुनिकामठी वरून घाटरोहणा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला कन्हान नदिचा पात्रा लगत असलेल्या झाडाला संजीव महालोधी यांचा मुतदेह गळफास घेतलेला अवस्थेत मिळुन आल्याने फिर्यादीं मुलाच्या तोंडी बयाणा वरून कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.४ ऑगस्ट २०२१ चे ६.३० वाजता दरम्यान संकेत संजीव महालोधी वय २२ वर्ष राहणार. विवेकांनद नगर कन्हान यांचे वडील नामे संजीव हिरालाल महालोधी वय ४७ वर्ष राहणार.विवेकानंद नगर कन्हान हे त्याची दुचाकी वाहन गाडी क्रमांक एम एच ४० एयु ११४१ घेवुन घरी कोणाला काही न सांगता निघुन गेले. संकेत महालोधी चे काका हे त्याचा परिसरात शोध घेत असता शनिवार दिनांक.७ ऑगस्ट २०२१ चे सकाळी ११ वाजता दरम्यान जुनिकामठी वरून घाटरोहणा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला कन्हान नदी पात्राच्या काठा लगत असलेल्या झाडाला गळफास घेऊन मृत अवस्थेत संजीव हिरालाल महालोधी दिसुन आल्याने कन्हान पोलीसाना सुचविले असता कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यशवंत कदम, एपीआई अमित कुमार आत्राम, हेडकॉस्टेबल जयलाल सहारे कर्मचाऱ्यां सह घटनास्थळी पोहचुन मुतदेह खाली उतरवुन ताब्यात घेऊन कामठी उपजिल्हा ग्रामिण रूगणालय येथे शवविच्छेदना करिता पाठवुन फिर्यादी मुलगा संकेत संजीव महालोधी याने सदर मृतकाचा मारणा बाबत कोणावरही शक व संशय नाही असे सांगितल्याने त्यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी मर्ग क्रमांक २९/२१ कलम १७४ जाफौ दाखल करून तपासात घेतला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे सपोनि अमित कुमार आत्राम हे करीत आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …